Dairy Business : भारतीय श्‍वेतक्रांतीचे मूळ ‘अमूल’

Diwali Article 2024 : १९४६ मध्ये केवळ २४७ लिटर दूध संकलनासह सुरू झालेल्या खेडा दूध संघ व ‘अमूल’कडे आता प्रति दिन एक कोटी लिटरपेक्षाही अधिक दूध संकलित होते. त्यातून ताज्या दुधासोबत अन्य प्रक्रिया पदार्थांची निर्मिती आणि मार्केटिंग केले जाते.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

Amul Dairy : गुजरातमध्ये पोहोचल्यावर कोणत्याही खेडेगावात गेल्यावर आपल्याला घरटी दोन ते चार गाई किंवा म्हशी दिसतात. तेथील खेडूतांशी मी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तरे देताना तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत मध्ये मध्ये येणारे गोंडस गुजराती शब्द आणि लय ऐकतच राहावी अशी. या दूध उत्पादकांच्या बोलण्यामध्ये ‘‘मारी डेरी, मारा खेडा, तमारू अमूल’’ असे शब्द मध्ये मध्ये सतत येत होते.

माझ्यासोबत असलेले डॉ. योगेश पटेल आणि डॉ. धर्मेशभाई पटेल (दोघेही व्हेटर्नरी डॉक्टर) आवश्यक तिथे हिंदींमध्ये भाषांतर करत माझी मदत करत होते. त्यांच्या बोलण्यातून एका क्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे, हे सारे तर सतत ‘माझी डेअरी, माझे खेडा, आपले अमूल’ असे म्हणत आहेत. त्यांच्या स्वतःच्याच मालकीची डेअरी असावी, इतका आपलेपणा अमूल डेअरी विषयी आला कोठून?

Dairy Business
Dairy Farming : नियोजनबद्ध दुग्ध व्यवसायातून आर्थिक उन्नती

गुजरात प्रत्येक जिल्ह्याचा एक असे १८ जिल्हा दूध संघ वेगवेगळ्या नावाने कार्यरत आहेत. पण तरीही त्यांच्यामध्ये एकीचा धागा आहे, तो म्हणजे गुजरात सहकारी दूध उत्पादक फेडरेशन (जीसीएमएमएफ). सर्वांचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विकले जातात ते अमूल ब्रॅण्डनेच. भारतातील दूध क्रांतीची सुरुवात याच भागात आणि याच सामान्य वाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या, महिलांच्या सहकार्याच्या भावनेतून झाली, हे जाणवताच माझ्या अंगावर चक्क रोमांच उभे राहिले.

आणंदच्या जवळच असलेल्या गाना गावातील गाना दूध सोसायटीला भेट दिली. महाराष्ट्रातील कुठल्याही दूध संकलन केंद्राप्रमाणे असलेल्या या सोसायटीमध्ये मला भेटले जयेशभाई ईश्‍वरभाई पटेल. या सोसायटीचे सचिव असलेले जयेशभाई माहिती सांगू लागले. आमच्या सोसायटीमध्ये हंगामात दोन हजार आणि बिगर हंगामात १५०० लिटर दूध संकलित होते. दूध उत्पादक सदस्यांची संख्या ४०० असून, त्यातील २५० ते ३०० हे जास्त अॅक्टिव्ह आहेत.

Dairy Business
Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

सध्या गावात लहानमोठ्या धरून चारशे म्हशी आणि आठशेवर गाई आहेत. या डेअरीमध्ये एक सचिव, संगणकचालक, दूध भरणारा, कृत्रिम रेतन करणारा (एआय टेक्निशियन) आणि लसीकरण करणारा असे साधारणपणे पाचजण कायमस्वरूपी काम करतात. या लोकांना कामाप्रमाणे २० ते २४ हजार रुपये प्रति वर्ष इतके मानधन मिळते. अमूलतर्फे मानधनावर विविध सेवा आणि पुरवठ्यावर लक्ष ठेवणारी एक व्यक्ती कार्यरत असते.

दूध उत्पादकांना अमूलकडून प्रति लिटर प्रति किलो फॅट सर्वाधिक दूध दर देण्यात येतो. सध्या गाईच्या दुधाचा दर ३७८ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ८८० रुपये इतका दर मिळतो. आमच्या गावामध्ये पशुपालनाचे काम प्रामुख्याने महिला पाहतात. प्रत्येकाकडे २ ते ४ जनावरे आहेत. १० व त्यापेक्षा अधिक जनावरे असलेल्या शेतकऱ्यांची संख्या फक्त १० इतकी आहे. डेअरीमध्ये दूध घातल्यानंतर त्याच वेळी त्याचा एक मेसेज दूध उत्पादकाला मोबाइलवर पोहोचतो.

दर दहा दिवसांनंतर अकराव्या दिवशी दुधाचे पैसे बॅंकेत जमा होतात. ते शक्यतो घरातील महिला सदस्यांकडेच राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक आत्मनिर्भरतेची व आत्मविश्‍वासाची भावना दिसते. या वर्षी आमच्या सोसायटीची उलाढाल तीन कोटी रु. पर्यंत झाली आणि सोसायटीने २१.५ टक्के इतका बोनस शेतकऱ्यांना दिला. शास्त्रीय पद्धतीने पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्याला दूध उत्पादन, कालवडी, शेणखत व अन्य सर्व बाबीतून त्याच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो. लहान शेतकरी स्वतःची दुधाची गरज भागवून वर्षाला चाळीस हजार ते एक लाख रुपये नक्कीच मिळवत असल्याचे त्यांनी सांगितले.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com