Village Biodiversity : गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवण्याची गरज

Development of Village : गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोहोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले.
Madhukar Raje Ardad
Madhukar Raje ArdadAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : गावांचा सर्वांगिण विकास करताना निसर्ग रक्षण, पर्यावरणाला हानी न पोहोचवता गावशिवाराची जैवविविधता अबाधित ठेवावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय स्तरावरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानअंतर्गत २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षातील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता व विशेष पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त अर्दड यांच्या हस्ते झाले. या वेळी विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा, सहायक आयुक्त सिमा जगताप उपस्थित होते.

Madhukar Raje Ardad
Bio-Diversity : पठारांवरील जैवविविधता संवर्धनाची गरज’

अर्दड म्हणाले, की संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता चळवळ उभी राहिली, ती अविरतपणे सुरू आहे. या अभियानाची दखल देशाने घेतली. अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये वैयक्तिक, सार्वजनिक, शालेय स्वच्छता विषयक उपक्रम राबविले जात असून मोठ्या प्रमाणात लोकसहभागाच्या माध्यमातून विकास कामे केली जात आहेत.

प्रत्येकाने आपल्या गावात लोकसहभागातून विकासकामे केली तर ही विकासकामे राज्यातील इतर गावांनाही दिशादर्शक ठरतील. आपण नैसर्गिक स्रोतांचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, त्याचा विनाश न करता ते पुढच्या पिढीला उपयुक्त ठरतील, त्यासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. गावांचा विकास करताना निसर्ग जपण्यासोबतच सेंद्रिय शेतीकडेही वळावे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय विकास उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी केले. त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. सहायक आयुक्त (विकास) सीमा जगताप यांनी आभार मानले. कार्यक्रमात लाडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री बागड व हाडोळी ग्रामपंचायतीचे सरपंच माधवराव अमृतवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

Madhukar Raje Ardad
Pocra Project : अनुदानासाठी दिलेल्या अवजारांच्या देयकांची होणार तपासणी

विभागीय पातळीवरील पुरस्कार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम प्रथम पुरस्कार (विभागून)

जवळगाव (ता. हिमायतनगर, जि. नांदेड). हाडोळी (ता. भोकर, जि. नांदेड)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम द्वितीय पुरस्कार (विभागून)

भडंगवाडी (ता. गेवराई, जि. बीड). नळगीर (ता. उदगीर, जि. लातूर)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम तृतीय पुरस्कार (विभागून)

कंडारी (ता. बदनापूर, जि. जालना). ब्राह्मणगाव (ता. जि. परभणी)

विशेष पुरस्कार

स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (सांडपाणी व्यवस्थापन)

मस्साजोग (ता. केज, जि. बीड)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता)

उमरा (ता. जि. हिंगोली)

स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (शौचालय)

लाडगाव (ता. जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com