Milk Price Protest : दूध आंदोलकांना सरकारचा तोडगा पुन्हा अमान्य; आता 'महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन' 

Milk Producer Farmers Sangharsh Committee Protest : दूध हमीभावाबद्दल ठोस आश्वासन सरकारकडून मिळत नसल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. 
Dr. Ajit Navale
Dr. Ajit NavaleAgrowon
Published on
Updated on

Akole News : दुधाला प्रति लिटर ४० रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन केले जात आहे. अकोले येथे सुरू असणाऱ्या आंदोलनाचा बुधवारी ४० वा दिवस असून कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. यादरम्यान कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली काढून देखील सरकारला जाग आलेली नाही. तर राज्याचे दुग्धविकास आयुक्त मोहोड यांनी संगमनेर प्रांत कार्यालय शुक्रवारी (ता.२६) चर्चा झाली. यानंतरही काहीच होत नसल्याने आता महामार्ग मेगाब्लॉक आंदोलनाचा इशारा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. 

यावेळी डॉ अजित नवले यांनी, राज्याचे दुग्धविकास आयुक्त मोहोड यांच्याशी झालेली चर्चा आणि मान्य करण्यात आलेल्या मागण्यांचे मिनिट्स मंगळवारी हस्तांतरित झाल्याची माहिती दिली. तसेच यावर कोतुळ येथील मंडपात आंदोलकांबरोबर जाहीर चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या काही मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मात्र सरकार काही दुधाला ४० रूपये दर देण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. याबाबत पुरेशी स्पष्टता दिसत नाही. तर निवडणुकीच्या तोंडावर अनुदान दिले जाईल. तोवर दर पडणार नाहीत याची काळजीही घेतली जाईल, मात्र निवडणूक झाल्यानंतर काय पुन्हा येरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती निर्माण होणार का? अशा शंकेने शेतकऱ्यांना अस्वस्थ केल्याचे नवले म्हणाले.  

Dr. Ajit Navale
Milk Price Protests : सातवा दिवस दूध उत्पादकांसाठी, विधीमंडळाचा दारात महाविकास आघाडीची निदर्शने

तर मागील अनुभव पाहता अनुदानाची नाटके दोन-तीन महिने चालतात आणि पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. यावेळीही पुन्हा तसेच होईल, अशी रास्त भीती शेतकरी व आंदोलकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्याबद्दल जोवर धोरण घेतले जात नाही, तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम निर्धार दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ आंदोलकांनी केल्याचे नवले यांनी सांगितले आहे.

तसेच पशुखाद्य कंपन्या पशुखाद्याचे दर सातत्याने वाढवत आहेत. पशुखाद्यांच्या दराला लगाम लावण्याबद्दल कोणताही ठोस पर्याय सरकारने समोर ठेवलेला नाही. सरकार शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरत असल्याचे हे ध्योतक आहे. अशा पार्श्वभूमीवर आंदोलन कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येणार नाही असा ठाम विश्वास आंदोलकांच्या वतीने व्यक्त केल्याचेही नवले म्हणाले. 

Dr. Ajit Navale
Milk Price Hike Movement : '...आता दुग्धाभिषेक घातला आहे, नंतर शेणाने...'; दूध दर वाढीवरून ठाकरे गट आक्रमक

तर सरकारने दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व कोतुळ आंदोलकांनी केलेल्या मागण्यांवर येत्या चार दिवसांमध्ये ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी नवले यांनी केली आहे. तर आता सरकारने यामध्ये चालढकल केल्यास महामार्ग रोखत 'शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक' आंदोलन सुरू करू असा इशारा डॉ. अजित नवले यांनी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिला आहे. 

यावेळी सदाशिव साबळे, विनोद देशमुख, नामदेव साबळे, अभिजीत उर्फ बबलू देशमुख,  भाऊसाहेब देशमुख, प्रकाश देशमुख, अभि देशमुख, वैभव देशमुख, चेतन साबळे, बाळासाहेब गीते, भाऊसाहेब देशमुख, गणेश जाधव, भाऊसाहेब पोखरकर, योगेश देशमुख, ज्ञानेश्वर डेरे, राजेंद्र सकाहरी देशमुख, अमोल तानाजी देशमुख, गौतम रोकडे आदींनी दिला आहे. निर्णयाच्या वेळी दत्ता ढगे, रवी पवार, भारत गोरडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com