Fruit Update : रंगीबेरंगी पावसाळी फळांनी बाजार सजला

Rain Update : उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर आता बाजारात परराज्यातील पावसाळी फळांची रेलचेलही वाढली आहे.
Fruit
Fruit Agrowon
Published on
Updated on

Mumbai Fruit News : उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर आता बाजारात परराज्यातील पावसाळी फळांची रेलचेलही वाढली आहे.

बिहारच्या लिचीपासून ते काश्मीरच्या चेरीपर्यंतच्या आंबटगोड फळांनी सध्या बाजारात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही फळे पावसाळ्यातच मिळत असल्याने ग्राहकांकडून चांगलीच मागणी आहे.

Fruit
Godan Fruit : भोकरवर्गीय गोदन का होतेय दुर्मीळ?

सध्या बाजारात परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर विविध फळे दाखल झाली आहेत. बिहारच्या लिचीची बाजारात सध्या सात ते आठ हजार बॉक्स येत आहेत. हे बॉक्स रेल्वे मार्गाने मुंबईपर्यंत येतात. तिथून मग ट्र्कमधून नवी मुंबईच्या बाजारात पोहचत आहेत. लिचीच्या दहा किलोच्या बॉक्ससाठी १५ ते २० हजार रुपयांचा दर मिळत आहे.

किरकोळ बाजारात लिची नगानुसार विकली जाते. त्याचबरोबर हिमाचल प्रदेशमधून प्लम बाजारात येत आहेत. त्‍याचे दररोज बाजारात सात ते आठ हजार बॉक्स येत आहेत. एका बॉक्ससाठी ५०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

तर नैनितालमधून पीच येत असून, सात ते आठ किलोच्या बॉक्समध्ये त्यांची आवक बाजारात होत आहे. याचबरोबर बाजारात काश्मीरची आंबडगोड, लाल पिवळी चेरी बाजारात भाव खात आहे. घाऊक बाजारात एक किलोचा साधारण दर १०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत दर्जेनुसार मिळत आहे.

आलुबुखार, लाला पिवळे ओले खजूर यांचीही आवक वाढली आहे. पावसाळा असेपर्यंत म्हणजे ऑगस्टपर्यंत बाजारात या रंगीबेरंगी फळांची आवक पाहायला मिळणार आहे. आता त्यांची आवक समाधानकारक होत असल्याने त्यांचे दरही नियंत्रणात असल्याचे फळ बाजाराचे संचालक संजय पानसरे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com