Kolhapur News: महाराष्ट्रात शेतकरी संघटनांचे उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलन सुरू असतानाच उत्तर कर्नाटकातही शेतकरी संघटनांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. यंदा उसाला प्रति टन ३५०० रुपये दर जाहीर करून ऊस तोडणी सुरू करावी, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटना एकवटल्या आहेत..रात्रं-दिवस निपाणी-मुधोळ महामार्गावर गुर्लापूरजवळ शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. ३५०० रुपये प्रति टन दर दिला पाहिजे, अशी मुख्य मागणी शेतकऱ्यांची आहे. शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी, शशिकांत पडसलगी यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्हा, तालुका पातळीवर शेतकरी संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत..Sugarcane Price Dispute: अन्यथा मुख्यमंत्र्यांचे स्वागत ‘स्वाभिमानी’ स्टाईलने.याशिवाय विविध मठांचे स्वामी, आजी-माजी सैनिक संघटना, वकील संघटना, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहेत. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कर्नाटक शासनाने अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे..बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यांतील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागत असल्याने वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमघ्ये बंद पाळण्यात येत आहे. यंदा पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने बंद असल्याची वेळ आली आहे..Sugarcane Price Protest: कोल्हापूर ऊसपट्ट्यात मोठ्या आंदोलनाची तयारी, ऊसदरावरून राजू शेट्टींची शेतकऱ्यांना हाक.कर्नाटकातील कारखान्यांनी दर जाहीर न करता हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न केल्याने काही कारखान्यांवर जाऊनही शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गळीत हंगाम रखडला असून अद्याप कुठलाही तोडगा निघाला नसल्याचे चित्र आहे. इतक्या मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरूनही लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत..महाराष्ट्रातील कारखान्यांना दिलासामहाराष्ट्रातही दर प्रश्नी विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या बरोबर पाऊसही सुरू आहे. यामुळे सीमाभागातील महाराष्ट्र हद्दीतील कारखाने अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. दरवर्षी कर्नाटकचे कारखाने अगोदर सुरू होतात. यामुळे महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होते. यंदा मात्र सीमाभागातील कारखाने आंदोलकांनी बंद केल्याने तिकडे होणारी ऊस वाहतूक टळली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कारखान्यांना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे..महाराष्ट्रातील कारखाना प्रतिनिधींची भेटबेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यांतील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनस्थळी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी येऊन आपण ३४०० रुपये दर देत असून आणखी पुढे देण्याबाबत आश्वासन देत आहेत. त्यामुळे हा दर मान्य करून शेतकरी संघटनेकडून या कारखान्यांना ऊस देण्यास मुभा दिली जात आहे. पण महाराष्ट्रात ऊस तोडणी बंद असल्याने महाराष्ट्रातील कारखानेही कर्नाटकातील ऊस नेण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे..महाराष्ट्रातील कारखाने ३४०० वर दर देत आहेत. मग कर्नाटकला का परवडत नाही. आम्ही हे खपवून घेणार नाही. आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.प्रकाश नाईक, रयत संघटना, कर्नाटक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.