Koturde Dam : महाडमध्ये कोतुर्डे धरणाची पातळी खालावली

कोतुर्डे धरणातून जलसंपदा विभागाकडून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने धरणाची पातळी खालावली आहे.
 Dam
DamAgrowon

Mahad News : कोतुर्डे धरणातून जलसंपदा विभागाकडून (Department of Water Resources) सिंचनासाठी पाणी सोडण्यात आल्याने धरणाची पातळी खालावली आहे. त्यातच वारंवार फुटणाऱ्या जलवाहिनीमुळे शहरांमध्ये पाणीटंचाई निर्माण होत असते.

महाड शहरामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर (Water Shortage) उपाययोजना करण्याबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी महाड नगरपरिषदेवर धडक दिली.

महाविकास आघाडीचे नेते हनुमंत जगताप यांच्या नेतृत्वाखाली माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, ठाकरे गटाचे शहरप्रमुख चेतन पोटफोडे, माजी नगरसेवक वजीर कोंडीवकर व प्रमोद महाडीक, सुदेश कळमकर, मंगेश देवरुखकर, सुबोध यादव इत्यादी या वेळी उपस्थित होते.

चार दिवसांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता जलसंपदा विभागाकडून कोतुर्डे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी नदीपात्रात सोडले जात आहे.

 Dam
Jalyukt Shiwar Scheme : ‘जलयुक्त’मधील घोटाळ्यांच्या चौकशीस ‘जलसंपदा’ला मनाई

तुलनेने सिंचन क्षेत्र कमी असल्‍याने बरेचसे पाणी वाहून जाण्याची शक्‍यता आहे. याच धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा होतो. लागवडी खालील क्षेत्र घटल्‍याने पाणी जपून वापरणे आवश्‍यक आहे. अन्यथा शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून धरणाचे पाणी येणे कमी येत असल्याने पंपिंग करून पालिकेला पाणी सोडावे लागते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची शक्‍यता लक्षात घेऊन उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

याबाबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे विचारणा केली. पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, टँकरची संख्या वाढवावी तसेच विंधन विहिरी, इलेक्ट्रिक पंप व साठवण टाक्या यांचे नियोजन केले जावे.

दादली पुलाजवळ टँकर भरण्याच्या टॅपवर बेकायदा पाणी चोरी होते, ती त्वरित थांबवावी, कुर्ले धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या उत्तर व पश्चिमेकडील जलवाहिन्यांना जोडण्याबाबत कार्यवाही केली जावी, अशी मागणी शिष्टमंडळांनी यावेळी केली. या मागण्यांचा विचार करून त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी यावेळी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com