Ramphal Leaves : रामफळाची पाने करतील लष्करी अळी, घाटेअळीच नियंत्रण

हैदराबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट) येथे झालेल्या संशोधनातून रामफळाच्या पानाचा वापर करुन विविध किडींच नियंत्रण करण शक्य झालय.
Ramphal Leaves
Ramphal LeavesAgrowon

पिकावरिल किडनियंत्रणासाठी (Pestcontrol) दिवसेंदिवस रासायनिक किटकनाशकांचा वापर वाढतोय. रासायनिक किटकनाशकांच्या अतिवापरामुळे प्रभावीपने किडनियंत्रण होत.

मात्र  निसर्ग आणि मानवी आरोग्यावर त्याचे दुरगामी परिणाम होताना दिसतात.किटकांमध्ये एखाद्या किटकनाशकाचा सतत वापर केल्यास त्या किटकनाशकांप्रती प्रतिकारशक्ती तयार होते.

त्यामुळे किटकनाशकांच्या सततच्या वापरामुळे मित्रकिटक, प्राणी, पक्षी त्यांच्या काही प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे जैविक पद्धतीनं कीड नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झालीय.

जैविक कीड नियंत्रणासाठी काही मित्र किटक तसच वनस्पतींचा वापर केला जातो. कृषी संशोधन संस्था, संशोधक, अभ्यासक, जाणकार असे जैविक किटकनाशक वापरण्याचा सल्ला देतात.  

Ramphal Leaves
Crop Protection : तुरीतील शेंगा पोखरणारी अळी, शेंगमाशीचे नियंत्रण

सेंद्रिय शेती पद्धतीत दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क अशा वनस्पतीच्या अर्काचा वापर केला जातो. आता रामफळाच्या पानाचाही वापर कीड नियंत्रणासाठी करण शक्य होणार आहे.

कारण हैदराबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूट फॉर द सेमी-एरिड ट्रॉपिक्स (इक्रिसॅट) येथे झालेल्या संशोधनातून रामफळाच्या पानाचा वापर करुन विविध किडींच नियंत्रण करण शक्य झालय.

अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळाव्यात या संशोधनाला तीसरे पारितोषीक मिळाल.

याशिवाय भारत सरकारच्या  विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने या संशोधनाचा प्रथम पारितोषीक देऊन गौरव केलाय.

Ramphal Leaves
मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी व्यवस्थापन

हैदराबाद येथील एफआयआयटीजेईई ज्युनिअर कॉलेजच्या सर्वेश प्रभू या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या इंटर्नशीपमध्ये इक्रिसॅट च्या कीटकशास्त्र विभागात 'जैविक कीड नियंत्रणासाठी रामफळाच्या पानांचा वापर' या प्रकल्पांतर्गत संशोधन केले.

या संशोधनांतर्गत जैविक कीड नियंत्रणासाठी रामफळाच्या पानाचे जैविक गुणधर्म तपासण्यात आले. याचे काही सकारात्मक परिणाम दिसून आले.

या संशोधनातील निष्कर्ष अमेरिकेतील अटलांटा येथे झालेल्या जगातील सर्वात मोठ्या प्री-कॉलेज आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि अभियांत्रिकी मेळाव्यात सादर केले.

रामफळामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत. ग्रामीण भागात अजूनही जुलाब तसच दातदुखी यासारख्या आाजारावर उपाय करण्यासाठी रामफळाच्या पानांचा वापर केला जातो.

रामफळातील याच गुणधर्माचा वापर कीड नियंत्रणासाठी होऊ शकतो का? हे तपासण्यात आले. रामफळाच्या पानांचा अर्क घाटे अळी, मावा आणि लष्करी अळी या अतिशय विनाशकारी किटकांच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरू शकतो.

प्रयोग शाळेत केलेल्या संशोधनातून रामफळाच्या पानाचा अर्क वापरुन ७८ ते ८८ टक्क्यांपर्यंत नियंत्रण करण शक्य झाल. पुढे प्रत्यक्ष पीकामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.

यातून मिळणाऱ्या निष्कर्षावरुन या जैविक कीडनाशकाची शिफारस केली जाणार आहे. अशी माहिती इक्रिसॅटच्या एक्सलेटेड क्रॉप इम्प्रूव्हमेंटचे संशोधन कार्यक्रम संचालक डॉ. सीन मेयस यांनी दिली. 

दरवर्षी हरभरा पिकावर घाटेअळी, मका, ज्वारी पिकावर लष्करी अळी चा प्रादुर्भाव होतोच.  या किडीमुळे २१ ते ५३ टक्क्यांपर्यंत नुकसान होतं.

मावा या रसशोषक किडीमुळे ३८ ते ४२ टक्क्यांपर्यंत नुकसान होत. या किडींच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा भरमसाठ खर्च होतो.

रामफळ कोरडवाहू परिस्थितीतही तग धरुन राहणार पीक आहे. रामफळाची लागवड पीक म्हणूनही होतेच.

याशिवाय शेताच्या बांधावरही रामफळाचे झाड सहजपणे येते. या संशोधनामुळे कीड नियंत्रणावर होणाऱ्या खर्चात बचत करण शक्य होणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com