Jaljeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढतोय

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तांतर झाले. जलजीवन प्रकल्पाच्या कामांबाबत ग्रामपंचायतींनी यापूर्वी ठराव पाठवून प्रकल्प मंजूर करून घेतले आहेत.
Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Agrowon
Published on
Updated on

Jaljeevan Mission News : जलजीवन मिशनच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच जिल्ह्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कामांत हस्तक्षेप वाढू लागला आहे.

त्यामुळे सुमारे चारशेहून अधिक प्रकल्पांची कामे उद्‌घाटनाविना रखडल्याचे चित्र आहे. या राजकीय हस्तक्षेपामुळे जिल्हा परिषद प्रशासनापुढे (Zp Administration) प्रश्‍न निर्माण झाला आहे.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तांतर झाले. जलजीवन प्रकल्पाच्या कामांबाबत ग्रामपंचायतींनी यापूर्वी ठराव पाठवून प्रकल्प मंजूर करून घेतले आहेत.

मात्र आता सरपंच एका गटाचा आणि उर्वरित सदस्य दुसऱ्या गटाचे अशी परिस्थिती ग्रामपंचायतीमध्ये निर्माण झाली आहे.

Jaljeevan Mission
Jal Jeevan Mission : जलजीवन मिशनसाठी जिल्ह्याला साडेसातशे कोटी रुपये

त्यामुळे सरपंचाने सुचविलेल्या ‘जलजीवन’च्या कामांना सदस्य, तर सदस्यांनी सुचविलेल्या कामाला सरपंच वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून विशेष करत आहेत. त्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे, या बाबत पंचायत समिती, जिल्हा परिषद अधिक प्रश्‍न निर्माण होत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्‌घाटनासाठी कामे थांबवू नका, अशी सूचना नुकतीच केली होती. राजकीय नेत्यांच्या हस्ते प्रकल्पाची उद्‌घाटने करण्यासाठीच चारशे ते पाचशे प्रकल्पांची कामे थांबल्याची माहिती समोर आली आहे.

झेडपी प्रशासनाला सरपंचासह राजकीय नेत्यांचे फोन येऊ लागले आहेत. दरम्यान, राज्य पातळीवरून कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश आले आहेत.

त्यामुळे एकीकडे विरोध आणि दुसरीकडे कामाच्या अंलबजावणी आदेशामुळे कामे कशी पूर्ण करायची असा प्रश्‍न जिल्हा परिषद प्रशासनाला पडला आहे.

मंगळवारपासून सुनावण्या सुरू

जलजीवनच्या कामांमधील अडथळे दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. अनेक कंत्राटदारांना काम सुरू करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवारपासून त्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. राजकीय अडथळ्यांमुळे कामे रखडली जाऊ नयेत.

मार्चपर्यंत कामे पूर्ण करण्याचे केंद्र सरकारचे आदेश आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्रशासनातील सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com