Taloda Market Committee Election Update : तळोद्यात बाजार समिती निवडणुकीच्या जागावाटपाचा ‘जर-तर’चा फेरा

तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या भाऊगर्दीने बिनविरोध की निवडणूक अशा जर तरच्या फेऱ्यात अडकली आहे.
Taloda Market Committee Election
Taloda Market Committee ElectionAgrowon

Nandurbar News : तळोदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक (Taloda Market Committee Election) राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाच्या भाऊगर्दीने बिनविरोध की निवडणूक अशा जर तरच्या फेऱ्यात अडकली आहे.

प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील तर बिनविरोधची परंपरा टिकेल व तशी तयारी सर्वच पक्षांची असताना मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जागा वाटपाच्या या जर-तरच्या फेऱ्यात महाविकास आघाडीने शेतकरी पॅनेल जाहीर करून आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे सूतोवाच करून टाकले आहे. त्यामुळे माघार घेण्याची मुदत अजून १५ दिवस असताना त्याआधीच दबावतंत्र सुरू झाल्याचे मानले जात आहे.

तळोदा बाजार समितीत आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करून पुढील काळात बाजार समितीचा कारभार आपण पाहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Taloda Market Committee Election
Solapur Apmc Election Update : सोलापुरात आठ बाजार समित्यांसाठी चुरस वाढली

राजकीय परिस्थितीदेखील भक्कम असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपकडे स्वतः आमदार राजेश पाडवी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी अशी भक्कम नेतृत्वाची फळी आहे. त्यात सहकारी संस्था व ग्रामपंचायत मतदार संघात त्यांचे प्राबल्य आहे.

दुसरीकडे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील सर्व १८ जागी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही उमेदवारी केली आहे. त्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सभासदांनी माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात बैठक घेत महाविकास आघाडी शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट

बाजार समितीची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. तो बाजार समिती पेलू शकेल अशी परिस्थिती नाही. कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील वेळेवर होत नसल्याची परिस्थिती आहे. अशा बाबींचाही विचार सर्वांनाच करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com