नागपूर : ‘‘विदर्भाच्या औद्योगिक विकासावर लक्ष (Focus on the industrial development of Vidarbha) आहे. नव्याने गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन उद्योगांना आकर्षित करणारा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ हा गुंतवणुकीचा महोत्सव नागपुरात घेण्याचा शासन विचार करत आहे,’’ अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई (Industry Minister Subhash Desai) यांनी दिली.
विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५८ वा स्थापन दिवस आणि चौथ्या व्हीआयए सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्काराचे वितरण झाले. या वेळी ‘व्हीआयए’चे अध्यक्ष सुरेश राठी, माजी न्यायमूर्ती आर. के. देशपांडे, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, दालमिया सिमेंट (इं.) लि.’चे कार्यकारी संचालक हकीमुद्दीन अली, ‘आर. सी. प्लास्टो’चे टॅक्स ॲण्ड पाइप्सचे संचालक विशाल अग्रवाल, खासदार कृपाल तुमाने, आमदार ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते. या वेळी नऊ वर्गवारीत विदर्भातील उद्योजकांना पुरस्काराचे वितरण देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.देसाई म्हणाले, ‘‘विदर्भात गुंतवणूकदार येण्यास तयार आहेत.
नागपूर व अमरावती या ठिकाणी विशेष प्रयत्न सुरू आहे. यवतमाळसारख्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाची एक कंपनी गुंतवणूक करण्यास पुढे आली आहे. त्यासाठी प्रयत्न शासनस्तरावर तसेच संघटनात्मक स्तरावर सुरू आहेत. लघू उद्योगांनी (industrial) पाठपुरावा करून आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणाव्यात. राज्य सरकार अशा उद्योजकांना मदत करण्यास सदैव तयार आहे.’’
‘‘स्पर्धेच्या युगात महिला उद्योजकांनी ठसा उमटविणे हे आव्हानात्मक काम आहे. शासनाने महिला उद्योजकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्याचा फायदा घ्यावा. युवकांनीही उद्योग स्थापनेसाठी पुढे यावे’’, असे आवाहन देसाई यांनी केले.
नेत्यांच्या घरासमोर शेतकरी (Farmer) आक्रोश भोंगे वाजवणार शेतकरी नेते विनायकराव पाटील यांचा इशाराॲग्रोवन वृत्तसेवा यवतमाळ : ‘‘राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या वाचाळ नेत्यांचे एकमेकांविरुद्ध दररोज भोंगे वाजत आहेत. या कर्कश आवाजात शेतकऱ्यांच्या (Farmer) मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे भेांगे बंद करून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. अन्यथा, मंत्रालयासमोर व वाचाळ नेत्यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवतील,’’ असा इशारा शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी दिला.यवतमाळ येथे आयोजित एका बैठकीत पाटील बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना निवेदन पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली. त्यानुसार, १ मेपासून शेतकऱ्यांना दररोज दिवसा १० तास वीज द्यावी, उसाचे बिल एफआरपी प्रमाणे एक हप्त्यात द्यावे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर ४० रुपये भाव द्यावा. राज्यापुरता हमीभाव कायदा लागू करावा.
तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना बियाणे (Farmer Seed) व खतासाठी एकरी १० हजार रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.येत्या मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तर मुंबई येथे मंत्रालयासमोर व वाचाळ नेत्यांच्या घरासमोर शेतकरी आक्रोश भोंगे वाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पाटील यांनी दिला. शेतकरी नेते सिकंदर शहा, अशोक भुतडा, बाळू निवल, उत्तम गुल्हाणे, बाळू चव्हाण, दीपक मडसे, अविनाश रोकडे, बाळू विरुपकार, केदार गायकी आदी उपस्थित होते.....यवतमाळ : येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना शेतकरी नेते विनायक पाटील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.