Krishi Ratna Award : शेताच्या बांधावर जाऊन ‘कृषिरत्नां’चा सन्मान

Honor of Krishi Ratna : अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार हा अकोला जिल्ह्यातील विवरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी वैज्ञानिक डॉ. संजय काकडे व सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते देविदास धोत्रे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Krishi Ratna Award
Krishi Ratna AwardAgrowon

Amravati News : अमरावती येथील राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार हा अकोला जिल्ह्यातील विवरा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी वैज्ञानिक डॉ. संजय काकडे व सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते देविदास धोत्रे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

देशाचे माजी पंतप्रधान, संगणक क्रांतीचे जनक स्व. राजीव गांधी यांना संपूर्ण शेतकरी समाजाच्या वतीने विनम्र आदरांजली करण्यात आली. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा झाला. अध्यक्षस्थानी पौर्णिमा सवाई होत्या.

Krishi Ratna Award
Padma Award : राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींनी केले ६६ जनांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित

प्रमुख पाहुणे म्हणून राजीव गांधी ग्रुपचे विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, प्रा. डॉ. दिलीप काळे, डॉ. अनिल ठाकरे, अविनाश पांडे, भय्यासाहेब निचळ, राहुल तायडे, सोमेश्वर गावंडे, अनुल्ला खान, नीलेश उभाड, अक्षय साबळे उपस्थित होते.

Krishi Ratna Award
Agriculture Farmer Award : कृषिभूषण, उद्यानपंडित, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारांनी शेतकऱ्यांचा गौरव

दरम्यान, कृषी क्षेत्राला विज्ञानाची जोड देणाऱ्या स्व. राजीव गांधी यांच्या सारख्या महान नेतृत्वास शेतकरी समाज कधीच विसरणार नसल्याचे पौर्णिमा सवाई यांनी सांगितले. तर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान होणे, ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रकाश साबळे यांनी केले.

याप्रसंगी शेतकरी प्रतिनिधी कुवरसिंग मोहने, अतुल पाटील, रमाकांत महल्ले, सचिन बुटेपिंजर, रामजी आखरे, श्री. ढोणे, पुंडलिक बंड, दिनेश पजई, रामदास धोत्रे, सतीश अभिजित वंजारे, विनोद क्षीरसागर, उद्धव शेळके, सचिन फेंड, प्रभुदास बोंबटकार, गजानन बराटे, अमोल जवंजाळ तसेच गावातील सरपंच, उपसरपंच तालुका कृषी अधिकारी शेटे आणि विवरा ग्रामवासी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com