डॉ.सतीलाल पाटीलकीटकांची भाषा समजून घेण्यासाठी भरपूर संशोधन झालंय आणि होतंय. आपल्याला डोळ्यांना दिसतं, तसं कीटकांना दिसत नाही. त्यांची भाषा देखील वेगळी आहे. हवेतून विशिष्ट जैवरासायनिक संदेश पाठवून ते एकमेकांशी संपर्क साधतात. हे जैवरासायनिक संदेश ज्या रसायनांमुळे होतात त्यांना ‘सेमीओकेमिकल्स’ असं म्हणतात. ‘फेरोमोन’ हे याच प्रकारात मोडतात. या जैवरासायनिक भाषेमार्फतच त्यांचे मिलन होते, ते एकत्र येतात, आपल्या भाऊबंदांचा आणि शत्रूंचा माग काढतात, एकमेकांना सतर्क करतात आणि साद-प्रतिसाद देतात. त्यांची ही जैवरासायनिक कुजबुज ‘इको-फ्रेंडली’ आहे. कोणतेही रासायनिक अवशेष नाहीत, की प्रदूषण नाही. .मनुष्यप्राणी हा विचित्र प्राणी आहे. त्याच्या अजब तऱ्हा आहेत. आता तुम्ही विचाराल ‘तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मुद्द्यावर या की राव’. येतो. आता बघा ना, पिकांवर कीड, रोग आला की तो म्हणतो....फवार रसायने आणि कर अन्न प्रदूषित. घरात, स्वयंपाकघरात झुरळ, मुंग्या झाल्या की म्हणतो.... फवार औषध आणि कर घर विषारी. हवेत डास तारसप्तकात गुणगुणताहेत? ....कर हवा विषारी. पण तो विसरतो, की हेच अन्न, हवा आपण आपल्या पोटात घेतो, आपण विषारी घरात राहतो. कीटकांच्या प्रतिशोधाच्या आगीत आपण, आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा बळी देतो. हे म्हणजे ‘वकिलाच्या फी पायी शेत विकलं तरी चालेल, पण बांधाची केस हरणार नाही’ यासारखं झालं..Insects Management: ग्रीन लेसविंग्सची ओळख.अन्नातून येणाऱ्या रसायनामुळे घातक आजार होताहेत. हर्बलच्या नावाखाली घरात फवारलेल्या रसायनांमुळे अख्खे कुटुंब गुदमरल्याची कित्येक उदाहरणे आहेत. डासांवर सूड उगवत, रासायनिक कीटकनाशकाच्या ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चा फील घेत, लोकं विषारी झोपा घेताहेत. तरीही रसायनांचा अतिवापर सुरूच आहे. मला पण हा यक्षप्रश्न पडलाय. समजा आपल्या मालमत्तेवर जर कोणी अतिक्रमण केले तर आपण आधी त्याला समजावून सांगतो, प्रसंगी कायदेशीर कारवाई करतो. मग सर्व पर्याय संपल्यावरच इतर पर्यायांवर येतो. पण कीटकांच्या प्रादुर्भावाबाबत मात्र आपण सरळ हिंसेवर उतरतो. आपल्याला जर कीटकांची भाषा समजली असती तर त्यांच्याशी बोलून मध्यममार्ग शोधू शकलो असतो..जैवरासायनिक संदेशाची देवाणघेवाणकीटकांची भाषा समजून घेण्यासाठी भरपूर संशोधन झालंय आणि होतंय. आपल्याला डोळ्यांना दिसतं तसं कीटकांना दिसत नाही. त्यांची भाषा देखील वेगळी आहे. हवेतून विशिष्ट जैवरासायनिक संदेश पाठवून ते एकमेकांशी संपर्क साधतात. हे जैवरासायनिक संदेश ज्या रसायनांमुळे होतात त्यांना ‘सेमीओकेमिकल्स’ असं म्हणतात. ‘फेरोमोन’ हे याच प्रकारात मोडतात. या जैवरासायनिक भाषेमार्फतच त्यांचे मिलन होते, ते एकत्र येतात, आपल्या भाऊबंदांचा आणि शत्रूंचा माग काढतात, एकमेकांना सतर्क करतात आणि साद-प्रतिसाद देतात. त्यांची ही जैवरासायनिक कुजबुज ‘इको-फ्रेंडली’ आहे. कोणतेही रासायनिक अवशेष नाहीत, की प्रदूषण नाही..Insects Strip Livestock: पशुपालकांसाठी एक स्ट्रिप ठरत आहे वरदान?.फेरोमोनच्या इतिहासात डोकावायचे झाल्यास, जगातला पहिला फेरोमोनचा रेणू जर्मनीमध्ये शोधला गेला. जर्मनीमधील एका एडॉल्फने (हिटलर) लोकांना किड्यासारखं मारलं आणि दुसऱ्या एडॉल्फ (बुटेनंट) यांनी कीटकांच्या भाषेचा उलगडा करणारा पहिला रेणू शोधून काढला. जर्मन शास्रज्ञ एडॉल्फ बुटेनंट यांनी १९५९ मध्ये रेशीम कीटकातील कामगंधाचा ‘बॉम्बीकॉल’ हा फेरोमोन शोधून काढला. त्यासाठी त्यांनी तब्बल पाच लाख रेशीम कीटकाच्या मादी पतंगांचा अर्क काढला. त्यातून फक्त १२ मिलिग्रॅम फेरोमोन त्यांना मिळाला. या फेरोमोनमुळेच नर पतंग मादीकडे आकर्षित होतात हे त्यांनी शोधून काढले. याच आधारावर पिकांना नुकसान करणाऱ्या किडींचा फेरोमोन शोधून त्यांचा वापर शेतातील सापळ्यात केला जाऊ लागला..सुरुवातीला फेरोमोनचा वापर फक्त कामगंध वापरून किडींचे काम तमाम करण्यापर्यंतच मर्यादित होता. पण सध्याच्या आधुनिक संशोधनात वेगवेगळ्या प्रकारच्या फेरोमोनवर काम होतंय. त्यामध्ये कीटकांना एकत्र येण्याचे संदेश देणारे, एक दुसऱ्याला सतर्क करून ‘पळा पळा’ असा अलार्म देणारे, ‘माझ्या मागे या’ असे माग काढणारे ट्रेल फेरोमोन, आपल्या रहिवासी झाडाचा वास असलेला ‘काईरोमोन’ असे अनेक प्रकारचे फेरोमोन, सेमीओकेमिकल्स वापरून करून कीड नियंत्रणाच्या रसायनाविरहित पर्यायांवर संशोधन होत आहे..Crop Insect Infestation : सततच्या पावसामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव.फेरोमोन तंत्रज्ञानाच्या मर्यादा आणि त्यावरील उपायअजूनही फेरोमोन हे कीड नियंत्रणाचे साधन नसून किडीचे शेतातील प्रमाण दाखवायचे दिशादर्शक आहे असेच समजले जाते. हा समज बदलायला हवा.एका फेरोमोनमुळे एकाच प्रकारची कीड आकर्षित केली जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या फेरोमोनला एका बाटलीत नांदायला लावणे म्हणजे भावकीला बांधून ठेवण्यासारखे जिकिरीचे काम आहे. त्यामुळे त्यांच्या वापरावर मर्यादा येतात. पण भारतात एकाच फेरोमोनच्या फवाऱ्यात वेगवेगळ्या रस शोषक किडी, फळमाशी आणि भाजीपाल्यावरील माशी, अशा नाना तऱ्हेच्या किड्यांना आकर्षित करणाऱ्या तंत्रज्ञानाचा चंचुप्रवेश झाला आहे..वातावरणातील तापमान, वारा आणि अतिनील किरण यामुळे फेरोमोनवर परिणाम होतो. म्हणजे एका प्रकारच्या वातावरणासाठी तयार केलेले फेरोमोनचे उत्पादन दुसऱ्या प्रकारच्या वातावरणात उपयुक्त ठरत नाही. पण वेगवेगळ्या वातावरणात स्थिर राहणारी फेरोमोन उत्पादने विकसित होत आहेत. लवकरच त्यांचा उपयोग सर्वत्र होईल.किडींची संख्या कमी असेल तर फेरोमोनचा वापर जास्त प्रभावी ठरतो. म्हणजे फेरोमोनचा वापर अगदी सुरुवातीपासून, म्हणजे किडीने आपला संसार थाटायचा आत व्हायला हवा. म्हणजे त्याचा परिणामकारकता आपल्या उपयोगी येईल..Friend Insect : किडींचा फडशा पाडणारा मित्रकिटक : गवळण/प्रार्थना कीटक.अरासायनिक संकल्पनेकडे मात्र सरकार रासायनिक नजरेने पाहते. घातक रेसिड्यू फ्रीमध्ये खाऊ घालणारी रासायनिक कीटकनाशके आणि कोणतेही अवशेष न ठेवणारे रेसिड्यू-फ्री फेरोमोन त्यांच्या लेखी सारखेच. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या यादीत तर फेरोमोन शोधणे हे मतदारयादीत गायब झालेला मतदार शोधण्यासारखे आहे. अगदी बोटावर मोजता येतील एवढे फेरोमोन या यादीत रसायनांचा न्यूनगंड घेत कोपऱ्यात बसले आहेत. फेरोमोनच्या उत्पादनांना झुकते माप देऊन त्यांची संख्या वाढवली पाहिजे..पण या तंत्रज्ञानाचे भविष्य उज्ज्वल आहे. एकाच उत्पादनात वेगवेगळ्या प्रकारचे फेरोमोन नांदवून पीकनिहाय उत्पादने तयार करणे, लवकर उडून न जाणारे फेरोमोन उत्पादने बनवणे, ‘एआय’च्या मदतीने आपोआप फवारले जाणारे फेरोमोन, यासाख्या गोष्टींवर संशोधन आणि विकास जगभर होतोय. त्यावर आधारित उत्पादनांचा वापर तुरळक का होईना पण सुरू झालाय. जुन्या पद्धतीनुसार ल्युअरच्या गोळीत फेरोमोन भरून, डब्याच्या सापळ्यात किडे पकडले जातात. पण नवीन तंत्रज्ञानानुसार त्यांचे बाटलीबंद फवारे, घरातील डास नियंत्रणासाठी वापरले जाणारे डिस्पेन्सरसारखे ठरावीक वेळेला उडणारे फेरोमोनचे फवारे, ‘एआय’चा वापर करून कोणते आणि किती कीटक पकडले याचा हिशेब ठेवणारे स्मार्ट सापळे तयार होत आहेत. अशा अनेक नवनवीन उपयोगी तंत्रांचा वापर सुरू झाला आहे..Friendly Insects : मित्रकीटकांचे संरक्षण कसे करता येईल? .पिकांवर कीटकनाशके फवारणे येत्या भविष्यात कालबाह्य होईल. एआय आणि जैवरसायनांच्या क्षेत्रातील संशोधन उपद्रवी कीटकांशी संपर्क साधून आमच्या शेतात तुम्हांला बंदी आहे असे ठासून सांगेल. तमाम किडी, त्या बांधापलीकडे जाऊ नकोस, जिवाला धोका आहे हे आपल्या बाळांना बजावून सांगतील आणि बांधावरच मुक्काम ठोकतील. ‘एआय’मुळे उपद्रवी किडीच्या आगमनाची पूर्वसूचना मिळून, फेरोमोनचा जैवरासायनिक हाकारा आपोआप उठवला जाईल. पर्यायाने उपद्रवी कीटक आपोआप पिकापासून दूर होतील..बिनफवाऱ्याचे कीडनियंत्रण शक्य आहे. फक्त कीड नियंत्रण म्हणजे रसायन फवारून किडींच्या कलेवरांचा सडा पाडणे, ही मानसिकता घालवायला हवी. नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित फेरोमोनद्वारे कीटकांचे संततिनियमन करून दूरगामी परिणामांवर विश्वास ठेवायला हवा. ‘हम दो हमारे दो’चा नारा देत, लोकसंख्या वाढीला आळा घालणाऱ्या देशात, उपद्रवी कीटकांचे संततिनियमन कठीण जाणार नाही ही अपेक्षा. तर कान देऊन ऐका... किडे कुजबुजताहेत!.Friendly Insects : मित्रकीटकांचे संरक्षण कसे करता येईल? .कीड व्यवस्थापनात फेरोमोनचा वापरएकात्मिक कीड व्यवस्थापनात कामगंध सापळ्यात फेरोमोनचा वापर होतोय. त्यात शेतात कीड कधी येते, त्यांची संख्या किती आहे आणि कधी कीडनाशक फवारले पाहिजे, याच्या निर्णयासाठी फेरोमोन सापळ्यांचा उपयोग होतो. पण फेरोमोनचा वापर सक्रिय आणि परिणामकारक कीडनियंत्रणात होऊ शकतो, यावरचा भरोसा वाढतोय. याची काही उदाहरणे पाहूयात..मास ट्रॅपिंगया अंतर्गत फेरोमोन सापळ्यांचा फक्त स्काउंटिंगसाठी उपयोग न करता मोठ्या प्रमाणात किडींना सापळ्यात अडकवून, त्यांचे जीवनचक्र भंगून भविष्यातील त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी केला जातो. सुरुवातीच्या काळातच किडींना मोठ्या प्रमाणात फेरोमोनने आकर्षित करून त्यांची संख्या मर्यादित ठेवता येते..मेटिंग डिसरप्शन‘कीटक मिलन व्यत्यय’ ही नवीन संकल्पना आहे. एखाद्या शेतात किंवा हरितगृहात विशिष्ट प्रकारच्या फेरोमोनचा वास मोठ्या प्रमाणात सोडतात. त्यामुळे नर पतंगाला मादी कुठे आहे हे उमगत नाही आणि त्यांचे मिलन हुकते. त्यायोगे त्याचा पाळणा लांबतो आणि किडींचे संततिनियमन आणि पिकाचे संरक्षण असे दुहेरी हेतू साध्य होतात..उपयोगी कीटकांना आकर्षित करणेफेरोमोन तंत्रज्ञान किड्यांना आकर्षण किंवा अनाकर्षण, म्हणजे पळवून लावणे या दोन पद्धतींनी वापरले जाते. पण फक्त पिकांचे नुकसान करणाऱ्या कीटकांना आकर्षित करण्यापेक्षा त्यांच्या नैसर्गिक शत्रूंना, म्हणजे मित्र कीटकांना आकर्षित करून, त्यांच्याद्वारे कीडनियंत्रण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. म्हणजे थेट किडींना लक्ष न करता त्यांना खाणाऱ्या मित्र कीटकांना फेरोमोनद्वारे सुपारी देऊन काटा काढण्याच्या राजकीय खेळीचे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. सात समुद्र पोहून भारताच्या किनाऱ्याला लवकरच हे तंत्रज्ञान लागेल अशी अशा करूयात.- डॉ.सतीलाल पाटील ९९२२४५९७८४(लेखक हे ग्रीन-व्हिजन लाईफ सायन्सेस प्रा. लि. कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.