Weather Update : नक्षत्र बदलले; वातावरणात वाढला उन्हाचा चटका

Heat Weather : सोलापूर शहर व परिसरात आता उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. आज सोलापूर शहर व परिसरात ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
 Heat Wave
Heat WaveAgrowon
Published on
Updated on

Solapur News : या वर्षीचा पावसाळा आता अंतिम टप्प्याकडे येऊ लागला आहे. या वर्षी पावसाने जिल्ह्यात समाधानकारक हजेरी लावल्याने आगामी वर्ष शेती व पिण्याच्या पाण्यासाठी चांगले जाणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारपासून (ता. १३) सूर्याचा उत्तरा नक्षत्रात प्रवेश झाला आहे. नक्षत्र बदलले तरीही सोलापूरच्या वातावरणात फारसा काही परिणाम झाला असल्याचे दिसत नाही.

 Heat Wave
Cloudy Weather : मूग मळणीत ढगाळ वातावरणाने व्यत्यय

सोलापूर शहर व परिसरात आता उन्हाचा चटका हळूहळू वाढू लागला आहे. आज सोलापूर शहर व परिसरात ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्याला बैल पोळ्यानंतर खऱ्या अर्थाने सुरवात होत असल्याचा आजपर्यंत अनुभव आहे.

 Heat Wave
Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

यावर्षी मात्र पावसाने जूनच्या सुरवातीपासूनच दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना सध्या पाणी आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न व सिंचनाचा प्रश्‍न उजनी धरण भरल्याने सुटतो. त्यामुळे जिल्ह्याचे लक्ष कायम उजनीवर असते.

यावर्षी ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरण १०० टक्के भरल्याने जिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. रब्बीच्या पेरण्यासाठी आता शेतकरी मशागत करू लागला आहे. लवकरच रब्बीच्या पेरण्यांना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com