Silk Industry : ‘पोकरा’तून रेशीम उद्योगाला मिळालेले अर्थसाह्य ठरले ‘बूस्टर’

POCRA Subsidy : मराठवाड्यातील शेतीला संजीवनी ठरलेल्या रेशीम उद्योगाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले आहे.
Silk Industry
Silk IndustryAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील शेतीला संजीवनी ठरलेल्या रेशीम उद्योगाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांचे अनुदान दिले गेले आहे. अर्थात हे रेशीम उद्योगासाठी बूस्टरच मानता येईल.

राज्यातील १६ जिल्ह्यांतील ६०५३ लाभार्थींना १०५.६६ कोटींचा लाभ रेशीम व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी देण्यात आला आहे. यामध्ये तुती लागवडीपासून, अंडीपुंज वाढविण्यापासून, कोष निर्मितीपर्यंत आणि त्याही पुढे रेशीम धागा निर्मितीपर्यंत संपूर्ण उत्पादन साखळीला अर्थसाह्य दिले गेले आहे.

Silk Industry
Silk Industry : रेशीम उद्योग स्वयंपूर्णतेकडे...

समृद्धी सेरीकल्चर अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड नेकनूर, ता. जि. बीड रेशीम उत्पादन युनिट अंतर्गत रेशीम धागा उत्पादन व्यवसायासाठी ५४ लाख ४४ हजार ६२६ रुपये, प्रतिष्ठान रेशीम फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केकत जळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगरला रेशीम - चौकी संगोपन केंद्रासाठी १० लाख ९९ हजार ५६२ रुपये, सॉइल टू रेशीम शेतकरी उत्पादक कंपनी मर्यादा पाचनवडगाव, ता. जि. जालनाला रेशीम उत्पादन युनिटसाठी २३ लाख ५८ हजार २० रुपये, एकूण शेतकरी उत्पादक कंपनीसाठी ८९ लाख २२०८ रुपये वितरित करण्यात आले आहेत.

अकोला, अमरावती, बीड, बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली जळगाव, जालना, लातूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशीम, यवतमाळ या १६ जिल्ह्यांतील ७६० गावांतील लाभार्थ्यांना ही मदत देण्यात आली आहे.

Silk Industry
Silk Industry : ‘रेशीम उद्योगात उत्पन्न वाढविण्याची संधी’

त्यामध्ये जालन्यातील १५, अमरावतीमधील १९, बीडमधील ३४०९, बुलडाण्यातील ३८, छत्रपती संभाजीनगरमधील ९६९, धाराशिवमधील २११, हिंगोलीतील १२७, जळगाव मधील १९४, जालन्यातील ६८४, लातूरमधील १६५, नांदेड मधील ९३, नाशिक मधील १४, परभणीतील ५१, वर्धातील ४१, वाशीममधील ५ तर यवतमाळ मधील १८ लाभार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती ‘पोकरा’चे विजय कोळेकर यांनी दिली.

रेशीम उद्योगाला मिळाला आर्थिक आधार

मराठवाड्यात जवळपास १० हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर रेशीम उद्योग विस्तारला आहे. या विस्तारात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने ही लाभार्थ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com