PDKV : ‘पंदेकृवि’चा चेहरामोहरा बदलतोय

Dr. Sharad Gadakh : सप्टेंबर २०२२ मध्ये या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. शरद गडाख यांनी सूत्रे हातात घेतली आणि आता दोन वर्षांतच या विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल बघायला मिळून येत आहेत.
Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad GadakhAgrowon
Published on
Updated on

Akola News : एखादे नेतृत्व किती परिणामकारकपणे बदल घडवू शकते, हे बघायचे असेल तर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा परिसर हे निश्‍चित दाखवू शकेल. सप्टेंबर २०२२ मध्ये या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. शरद गडाख यांनी सूत्रे हातात घेतली आणि आता दोन वर्षांतच या विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल बघायला मिळून येत आहेत. प्रामुख्याने विद्यापीठाचे पडीक क्षेत्र उपजाऊ केले जात असून शेकडो एकरांवर फळबागा उभ्या होत आहेत. हे विद्यापीठ काही अंशी आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवर निघाल्याचे निश्‍चित म्हणता येईल.

आधीच्या कुलगुरूंनी येथे चांगले काम केले. आज त्यांचे काम पुढे नेले जात आहे. विद्यापीठाचा परिसर तोच आहे. या विद्यापीठात काम करणारे शास्त्रज्ञ, कर्मचारीही तेच आहेत. उलट गेल्या दोन वर्षांत अनेक पदे रिक्त झाली. कमी कर्मचाऱ्यांसह विद्यापीठाचा गाडा पुढे नेण्यासाठी डॉ. गडाख यांना कसरत करावी लागते हे लपून राहलेले नाही. अशाही परिस्थितीत त्यांनी स्वतःपासून सदैव काम करीत राहण्याचा पायंडा अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर ठेवला.

Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad Gadakh : बौद्धिक संपदेला व्यावसायिकतेची किनार गरजेची : कुलगुरू गडाख

डॉ. गडाख यांनी सन २०२२ मध्ये कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेतकरी, विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. या कृषी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्याला प्रथम वर्षापासूनच स्पर्धा परीक्षांसाठी फोरम तयार केले. स्पर्धा परीक्षांचे ४ फोरम, उद्योजकता विकासासाठी आणि हायटेक अॅग्रिकल्चर यापैकी किमान एका फोरमचे सभासद बनवून नियमित अभ्यासक्रमासह कृतियुक्त अभ्यासाचे धडे देत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करताना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. याद्वारे प्रत्येकी किमान ५० विद्यार्थी विकसित करण्याचे विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे. त्या दिशेने विद्यापीठाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी राष्ट्रीय स्तरावरील इंद्रधनुष क्रीडा स्पर्धांचे आयोजन नोव्हेंबर २०२४ मध्ये होणार आहे.

Dr. Sharad Gadakh
Dr. Sharad Gadakh : प्रगत तंत्रज्ञान गावपातळीपर्यंत पोहोचणे गरजेचे : डॉ. गडाख

शेतकऱ्यांसाठी ११०० हेक्टर क्षेत्र पाहण्याकरिता उपलब्ध

लोकाभिमुख जिरायती शेती, सेंद्रिय शेती, किफायतशीर शेती, कमी खर्चाची शाश्वत शेती, कौशल्य आधारित शेती पूरक व्यवसाय ग्रामीण युवक, युवती, शेतकरी महिला पुरुष यांच्यापर्यंत सक्षमतेने पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने संकल्प केला आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झालेली शिवारफेरी दिशादर्शक ठरली. चार कृषी विद्यापीठे, महाबीज आणि खासगी कंपन्यांच्या २२० पिक वाणांचे आणि तंत्रज्ञानाचे २० एकर क्षेत्रावर थेट प्रात्यक्षिक दाखवणारा नावीन्यपूर्ण शिवारफेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

विद्यापीठाच्या विविध संशोधन विभागांचे ११०० हेक्टर क्षेत्र शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याकरिता उपलब्ध करून दिले. शिवार फेरीला त्या वेळी ३५ हजारांवर शेतकऱ्यांनी भेट दिली. डिसेंबरमध्ये झालेल्या अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनाला राज्यातील सुमारे ७ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. विदर्भातील शेतकऱ्यांना उद्‌भविणाऱ्या विविध समस्या आणि इतर मुद्यांवर शास्त्रज्ञांसोबत चर्चा होऊन समाधान मिळण्याच्या हेतूने विद्यापीठांतर्गत ३५ केंद्रांवर शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन करण्यात आले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com