Kukadi Project : कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तळ

Kukadi Dam : कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे धरणांनी तळ गाठला आहे. महिनाभरात कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ १०० दशलक्ष घनफूट वाढ झाली आहे.
Kukadi Project
Kukadi ProjectAgrowon
Published on
Updated on

Pune News : कुकडी प्रकल्पांतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यामुळे धरणांनी तळ गाठला आहे. महिनाभरात कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात केवळ १०० दशलक्ष घनफूट वाढ झाली आहे. प्रकल्पात मंगळवारी (ता.२५) एक टीएमसी (३.५२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

धरणात पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात आजअखेर सरासरी ६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

प्रकल्पांतर्गत डिंभा, माणिकडोह, वडज, येडगाव, पिंपळगाव जोगा या धरणांचा समावेश होतो. प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठवण क्षमता तीस टीएमसी आहे. मागील वर्षी १५ ऑक्टोबर अखेर कुकडी प्रकल्पात २६.८२ टीएमसी (९०.३८ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला होता. पाणीसाठा कमी असताना कुकडी पाटबंधारे विभागाने पाणी वाटपाचे योग्य नियोजन करून रब्बीचे एक व
उन्हाळी दोन अशी तीन आवर्तने पूर्ण केली.

Kukadi Project
Dam Water Stock : रायगडमध्ये २४ धरणांनी गाठला तळ

पिंपळगाव जोगा धरणातील २.९ टीएमसी पाण्याचा वापर करून ३० मे ते २० जून २०२४ दरम्यान येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात २० दिवसांचे उन्हाळी आवर्तन सोडले होते. यामुळे पिंपळगाव जोगा धरणात जेमतेम एक टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे.

विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालावली
जुन्नर तालुक्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांत जेमतेम पाऊस झाला आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणीची कामे लांबली आहेत. आदिवासी भागातील धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही.

धरणांनी तळ गाठल्यामुळे कालवा व धरण पाणलोट क्षेत्र परिसरातील विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालावली आहे. मीना कुकडी नदीवरील काही कोल्हापूर बंधारे कोरडे पडले आहेत.

जुन्नर तालुक्यात खरीप पिकाखाली ३८ हजार ७१८ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी ४ हजार ५४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. फक्त १३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिन्यात तालुक्यात सरासरी ११५ मिलिमीटर पाऊस पडतो.

मात्र आज अखेर तालुक्यात सरासरी फक्त ६४ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. पावसाअभावी पेरण्या लांबल्या आहेत. पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. - गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com