Agriculture Export : देशाच्या कृषी निर्यातीत नऊ टक्क्यांनी घसरण

Agriculture Update : २०२३-२४ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची कृषी निर्यात ८.८ टक्क्यांनी घसरून ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यात घटलेल्या शेतीमालात तांदूळ, गहू, साखर, कांदा आदी महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.
Agriculture Market
Agriculture MarketAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : लाल समुद्रातील संकट, रशिया-युक्रेन युद्ध आणि देशांतर्गत निर्बंध आदींमुळे २०२३-२४ या आर्थिक वर्षातील एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत देशाची कृषी निर्यात ८.८ टक्क्यांनी घसरून ४३.७ अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यात घटलेल्या शेतीमालात तांदूळ, गहू, साखर, कांदा आदी महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे.

Agriculture Market
Agriculture Market : पिवळ्या वाटाण्याचा हरभरा, तुरीला धसका

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते फेब्रुवारी २०२२-२३ या दरम्यान ही कृषिनिर्यात ४७.९ अब्ज डॉलर होती. देशाच्या कृषीच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्येही (जीडीपी) लक्षणीय घट झाली आहे. २०२३-२४ मध्ये त्यात केवळ ०.७ टक्क्याने वाढ झाली आहे.

‘‘अपेडा’ची ७१९ कृषी उत्पादनांची निर्यात एप्रिल-फेब्रुवारी २०२२-२३ मधील २४ अब्ज डॉलरच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षाच्या ११ महिन्यांच्या कालावधीत ६.८५ टक्क्यांनी घसरून २२.४ अब्ज झाली आहे. निर्यात बंदी आणि तांदूळ, गहू, साखर आणि कांदा यांसारख्या वस्तूंवरील निर्बंधांमुळे गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ५-६ अब्ज कृषी निर्यातीला फटका बसला आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Agriculture Market
Agrowon Podcast : मक्याचा बाजारभाव स्थिर; कापूस, सोयाबीन, मका, तसेच लसूण दर काय आहेत?

इस्राईल-इराण युद्धाचा निर्यातीवर कोणताही परिणाम झालेला नाही. परंतु आम्ही परिस्थितीचे निरीक्षण करत आहोत. निर्यातीवर आतापर्यंत कोणतेही मोठे परिणाम झालेले नाहीत,’’ असेही अधिकाऱ्याने सांगितले.

उच्च श्रेणीतील भारतीय ब्रँड्सच्या निर्यातीत चांगली वाढ झाल्याने भारतीय मद्य पेयांच्या निर्यातीत गेल्या आर्थिक वर्षात वाढ नोंदवली गेली आहे,’’ असेही ते म्हणाले. जगाने २०२२ मध्ये ११३.६६ अब्ज किमतीच्या अल्कोहोलयुक्त पेयांची आयात केली आहे. त्यात २०२२ मध्ये भारताची निर्यात १८० दशलक्ष इतकी होती. अल्कोहोलयुक्त पेयांच्या जागतिक निर्यातीत भारत सध्या ४० व्या क्रमांकावर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com