
नगर : बसण्यासाठी आरामदायी खुर्ची, लिहिण्यासाठी गुळगुळीत वह्या, शिकविण्यासाठी सतर्क शिक्षक आणि दिमतीला शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी, तसेच कारखाना व्यवस्थापन देखील.
अशा दिमाखदार कार्यक्रमात अंबालिका शुगर कारखान्याच्या प्रक्षेत्रावर ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यांवरच त्यांच्या मुलांसाठी (Children of sugarcane workers) शैक्षणिक वर्ग (Education) अर्थात ‘साखरशाळा’ (Sugar School) सुरू झाली.
त्यामुळे ‘सर्जा-राजा’च्या सहवासातच या कोप्यांवर ‘बाराखडी’चा स्वर घुमू लागला आहे. यामुळे उपस्थित सर्व जण भारावून गेले.
कर्जत तालुक्यातील राशीन, सिद्धटेक परिसरात ‘उबंटू फाउंडेशन’ आणि अंबालिका शुगर कारखान्यातर्फे कारखाना प्रक्षेत्रावर ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखर शाळेचे नियोजन करण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश तावरे यांच्या हस्ते पहिल्या वर्गाला सुरुवात झाली. या वेळी कारखान्याचे संचालक विश्वजित भोसले, मुख्य संचलन अधिकारी जंगल वाघ, महाव्यवस्थापक सुरेश शिंदे, शेतकी अधिकारी विठ्ठल भोसले आदी उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या अशा मुलांसाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान देणे गरजेचे असल्याचे आणि त्याचबरोबर आधुनिक शिक्षणाचे तेही हकदार असल्याचे सांगितले.
शिक्षणाच्या महत्त्वाबरोबरच ‘उबंटू’च्या कामासाठी विद्यार्थी सहाय्यक समिती तसेच माजी विद्यार्थी मंडळाच्या कायमच पाठिंबा असल्याचे मनोगत सुनील चोरे यांनी व्यक्त केले. भांबोराच्या सरपंच माधुरी पाटील यांनी या साखर शाळेतील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे आवाहन शिक्षकांना केले.
देविदास गोडसे म्हणाले, ‘‘ऊसतोडणी कामगारांचा विषय हा सामाजिक न्याय विभागाकडे हस्तांतरित केला आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.