Praniti Shinde: मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये 

Election Integrity: अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये,’’ अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरात मंगळवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत टोला लगावला.
Praniti Shinde
Praniti ShindeAgrowon
Published on
Updated on

Solapur News: ‘‘अपयशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये,’’ अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापुरात मंगळवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत टोला लगावला.

खासदार प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळा आणि विविध विषयांसंदर्भात काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्या बोलत होत्या. खासदार शिंदे म्हणाल्या, की मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली, याचे उत्तर देत नाहीत, सीसीटीव्ही फुटेज विचारले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायदाच बदलून टाकला आणि सीसीटीव्ही फुटेज देता येत नाही म्हणून सांगितले.

Praniti Shinde
Agrowon Podcast: टोमॅटो दर टिकून; तूर, भोपळा, बटाटा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

त्यामुळे फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये. महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे जनतेचे हाल होत आहेत, त्याकडे लक्ष द्यावे. सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव असून, आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काम करायला अडचण निर्माण करीत आहेत. भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे.

म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी यांना उघडे पाडावे. तसेच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात, असेही त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या, की प्रचारसभेत मोठमोठे फिल्मी डायलॉग मारणारे पंतप्रधान मोदीजी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवीत आहेत.

Praniti Shinde
Grape Export Issue: इस्राईल-हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंदच; द्राक्ष निर्यातदारांची चिंता वाढली!

व्यापाराची धमकी देऊन मीच भारत आणि पाकिस्तानला युद्ध थांबवायला सांगितले, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प या़ंनी आतापर्यंत बारावेळा जाहीरपणे सांगितले. त्या विषयावर पंतप्रधान मूग गिळून गप्प आहेत.

यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमकुवत होत आहे. जनतेची आणि विरोधी पक्षांची मागणी आहे, की संसदेत येऊन देशातल्या लोकांना त्याची माहिती द्यावी. या वेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com