Ahilyanagar News: राज्यासह देशातील ‘सहकारा’ला संजीवनी आणि शेतकऱ्यांना ऊर्जा देणाऱ्या सीबीजी/बायो सीएनजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) आणि मॅन्युलेटेड पोटॅश या दोन प्रकल्पांची पहिली मुहूर्तमेढ सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुप सहजानंदनगर (ता. कोपरगाव) येथे आज (ता. ५) रोवली जाणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकल्पांचे उद्घाटन होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख उपस्थित आहेत. .कै. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी साखर कारखानदारीत नवनवीन प्रयोग करून सर्वाधिक उपपदार्थ निर्मितीची जोड देऊन आदर्श निर्माण केला. साखर कारखाना आणि संजीवनी उद्योग समूहाने आणखी एक पाऊल पुढे टाकत देशातील पहिल्या सहकारी क्षेत्रातील सीएनजी आणि पोटॅश प्रकल्पाची निर्मिती केली आहे. देशातील सहकारी साखर कारखानदारीत या प्रकल्पांमुळे नवा इतिहास घडेल असे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी या वेळी सांगितले..MAGNET Project: ‘मॅग्नेट’ला गती द्या .संजीवनी युनिर्व्हसिटी ग्राउंड (कोपरगाव) येथे आज (ता.५) दुपारी १.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे, पालकमंत्री व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित राहणार आहेत..अध्यक्ष श्री. कोल्हे म्हणाले, की भारताची ऊर्जा मागणी सतत वाढत आहे. त्यासाठी बायो एनर्जी हा भविष्यातील सर्वोत्तम पर्याय आहे. केंद्र सरकार साखर कारखान्यांना सीबीजी प्रकल्प उभारणीकरिता प्रोत्साहन व आर्थिक साह्य करीत आहे. कारखान्याकडे सध्या स्पेंटवॉशवर आधारित बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरण करून बायोगॅस उत्पादन क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे..Sugar Industry: साखरेचा किमान विक्री दर ४२०० रुपये करा.स्प्रे ड्रायरसह ग्रॅन्युलेशन प्रकल्पस्पेंटवॉशवर आधारित बायोगॅस प्लांटमधील प्रक्रियेदरम्यान बायोगॅस सोबतच ‘बायोमिथेनेटेड स्पेंटवॉश’ मिळेल, या बायोमिथेनेटेड स्पेंटवॉशचे स्प्रे ड्रायरद्वारे ग्रॅन्युलेशन प्रकल्प प्रति दिन ७५ टन क्षमतेचा आहे. याशिवाय नवीन मल्टिपल इफेक्ट इव्हापोरेशन (एम.ई.ई.) प्रकल्प क्र. २ उभारण्यात आला आहे. याद्वारे मिळालेल्या कॉन्सट्रेटेड बायोमिथेनेटेड स्पेंटवॉशपासून पोटॅश पावडर तयार होईल व पोटॅश पावडरपासून ग्रॅन्युलेटेड पोटॅशची निर्मिती केली जाईल. ग्रॅन्युलेटेड पोटॅश हे उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे. त्याची विक्री कृभको, इफ्को यांसारख्या नामवंत खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना केली जाईल. या माध्यमातून सभासदांना व ऊस उत्पादकांना अल्प दरात खतेही उपलब्ध करून दिले जाणार आहेत..सी.बी.जी. प्रकल्प (कॉम्प्रेस्ड बायोगॅस)साखर कारखान्यातून निघणारे प्रेसमड व आसवनी प्रकल्पातून बाहेर पडणारे स्पेंटवॉश यापासून बायोगॅस निर्मिती होणार आहे. बायोगॅसमधून सल्फर बाहेर काढून त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय सल्फर (खत) तयार केले जाते. शुद्ध बायोगॅस (मिथेन गॅस) कॉम्प्रेस करून कॉम्प्रेस्ड बायोगॅसची (सीबीजी) निर्मिती केली जाते. प्रति दिन १२ टन क्षमतेचा सीबीजी उत्पादनाची क्षमता या प्रकल्पाची आहे. सीबीजी व बायो सीएनजी यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म एकसारखे आहेत. तयार झालेला सीबीजी तेल विपणन कंपन्यांना विक्री केला जातो, तसेच कारखाना स्वतःचे रिटेल आउटलेट काढून ‘सीबीजी’ची विक्री करणार आहे. या प्रकल्पामुळे कारखान्याचा आर्थिक फायदा होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.