Budget 2024-25 : देशाच्या जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया घालणारं अधिवेशन : अधिवेशनापूर्वी पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

Prime Minister Narendra Modi : सोमवारपासून (ता. २३) देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना आपले मनोगत व्यक्त केले.
PM Narendra Modi
PM Narendra Modi Agrowon
Published on
Updated on

Pune News : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (ता.२३) पासून सुरूवात होत आहे. तर मंगळवारी (ता.२३) देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण मांडणार आहेत. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिलेच अर्थसंकल्पीय विविध मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे. तर या अर्थसंकल्पातून काय मिळणार याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे. याआधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका करताना, विरोधकांनी आपला पराभव मान्य करून लोकहितासाठी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. तर यंदाचे अधिवेशन भविष्यात जनतेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाया घालणारं असेल असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, सोमवार हा श्रावणी असून आजपासून सुरू होणाऱ्या सत्राला महत्व आहे. त्यामुळे देशवासीयांना शुभेच्छा देतो. तसेच या अधिवेशनाकडे जनतेचं बारकाईने लक्ष असणार असून सरकार अधिवेशन सकारात्मकतेने पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल. तर यंदाचा अर्थसंकल्प हा मी दिलेल्या गॅरंटीची अंमलबजावणी करणारा असेल.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मोदींनी कार्यभार स्वीकारताच जारी केला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता

तब्बल ६० वर्षांनी देशात एकाच पक्षाची तिसऱ्यांदा सत्ता येण्याची बाब अभिमानास्पद असून तिसऱ्या पर्वातील पहिला अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान आम्हाला मिळत आहे याचा गर्व आहे. त्यामुळे मी देशवासीयांना ही हमी देतो की हा अर्थसंकल्प त्यांच्या स्वप्नांची अंमलबजावणी करणारा असेल. २०४७ मधील विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या अर्थसंकल्पाचा मजबूत पाया असेल असेही मोदी म्हणाले.

PM Narendra Modi
Prime Minister Narendra Modi :'आम्ही पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनतीने काम करू' : मोदी यांचे आश्वासन

पंतप्रधांनांचा आवाज दाबला

मोदी म्हणाले की, मी, सर्व पक्षांना आग्रह करतो की, त्यांनी पहिल्यांदा संसदेत खासदार म्हणून आलेल्यांना संधी द्यावी. त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी संधी देण्यात यावी. तर नवीन संसद भवनात १४० कोटी देशवासियांनी ज्या पक्षाला बहुमत दिले त्यांचाच आवाज चिरडण्याचा, अलोकतांत्रिक प्रयत्न झाला. हे झालेल्या अधिवेशानात पाहायला मिळाले. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही व्यवस्थेत अशा गोष्टींना स्थान नाही. पण ज्यांनी असं केलं त्यांना त्याचा पश्चातापही नाही. त्यामुळे हे सभागृहात देशवासियांठी या ना की पक्षासाठी.

विरोधकांना सल्ला

तर देशाला नकारात्मकतेची आवश्यकता नसून देशाला एका विचारधारेची, प्रगत आणि विकास देणाऱ्या विचारधारेची, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या विचारधारेची गरज आहे. त्यामुळे विरोधकांकडून सामन्य माणसांच्या आशा, अपेक्षा आहेत. त्यामुळे सभागृहात त्यांचा विचार करा. जानेवारी २०२९ मध्ये पुन्हा निवडणूका येतील तेंव्हा लढू. पण आता देशाच्या गरिबांचा, तरुणांचा विचार करा. जनतेचा आवाज बना असा खोडक सल्ला विरोधकांना मोदी यांनी दिला आहे. तर २०४७ मधल्या भारतासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com