Indian Education System : सुरुवात एका नव्या शिक्षण पद्धतीची

Article by Ganga Bakle : ‘सेल्फी विथ सक्सेस’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वतः शिकू देण्यास शिक्षक प्रेरित करतात. त्यामुळे एका नवीन शिक्षण पद्धतीची सुरुवात आता झालेली आहे. मुलांना स्वतः शिकण्याची-आव्हाने स्वीकारण्याची सवय होत आहे.
Indian Education System
Indian Education SystemAgrowon

Dynamic Learning for the Future : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये सांगितल्याप्रमाणे पायाभूत शिक्षण, विद्यार्थ्यांच्या सर्जनशील क्षमतेवर भर देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करणे या गोष्टींबरोबरच शिक्षण हे सर्वांसाठी सर्व गोष्टींचे, एकात्मिक, काळानुरूप आव्हाने स्वीकारणारे, आनंददायी असेल; या अनुषंगाने वातावरण निर्मिती झालेली आहे.

शाळेत येणाऱ्या सर्व मुलांना सर्वसमावेशक असे वातावरण निर्माण करणे, त्यांची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन त्यानुसार बहुभाषिक गरजा आणि विविध शैक्षणिक क्षमतांची काळजी घेणे, विद्यार्थ्यांना सर्वार्थाने शिक्षणात आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करणे अपेक्षित आहे.

या सर्व गोष्टींचा विचार करता शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांना ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन पारंपरिकतेपेक्षा परिवर्तनीय असून, ते गतीने व्हावे यासाठी शिक्षकांनी काळसुसंगत सुसज्ज असावे, हे सांगण्यात आले आहे. शिक्षकांनीही प्रशिक्षणातून मिळालेल्या गोष्टींचा उपयोग आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये प्रशिक्षणानंतर लगेच सुरू केलेला आहे.

प्रारंभी सांगितल्याप्रमाणे वर्तमानकाळ हा आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा आहे. शिक्षणातही तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी आणि परिणामकारक करणे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दृष्टीने गरजेचे झालेले आहे. त्यामुळे स्वतःच्या भ्रमणध्वनीवर शिक्षकांनी ‘सेल्फी विथ सक्सेस’ हा उपक्रम गतिमान केलेला आहे.

Indian Education System
Right to Education : गरिबांच्या शिक्षण हक्कावर गदा

या सर्व गोष्टींचा विचार करता शिक्षण विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वच शिक्षकांना ‘अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे अध्ययन पारंपरिकतेपेक्षा परिवर्तनीय असून, ते गतीने व्हावे यासाठी शिक्षकांनी काळसुसंगत सुसज्ज असावे, हे सांगण्यात आले आहे. शिक्षकांनीही प्रशिक्षणातून मिळालेल्या गोष्टींचा उपयोग आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये प्रशिक्षणानंतर लगेच सुरू केलेला आहे.

प्रारंभी सांगितल्याप्रमाणे वर्तमानकाळ हा आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा आहे. शिक्षणातही तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी आणि परिणामकारक करणे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या दृष्टीने गरजेचे झालेले आहे. त्यामुळे स्वतःच्या भ्रमणध्वनीवर शिक्षकांनी ‘सेल्फी विथ सक्सेस’ हा उपक्रम गतिमान केलेला आहे.

शिक्षकांनी वर्गात विद्यार्थ्यांना अध्यापन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत झालेला बदल अनुभवाच्या पातळीवर इतरांनाही यावा याकरिता व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सेल्फी काढून शेअर करणे आता सर्वत्र झालेले आहे. यामुळे अध्यापन आणि अध्ययनाची प्रक्रिया द्विध्रुवात्मक होऊन यश आणि सामूहिक शैक्षणिक कार्य पार पडत आहे. आपण आता शिक्षणाच्या प्रवाहात कसे बदलत आहोत?

कोणत्या कृती करत आहोत? त्यांचे यश कसे साकार होत आहे? आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सेल्फी विथ सक्सेस हा आनंददायी उपक्रम असल्याचे अधोरेखित होत आहे. प्रतिभा आणि प्रतिमा उजळून काढणारा हा उपक्रम सर्वांच्या आवडीचा झालेला आहे. शिक्षणाच्या पातळीवर शिक्षकांच्या दृष्टिकोनातून सेल्फी विथ सक्सेस व्हॉट्सॲप ग्रुपही तयार झालेले आहेत.

या ग्रुपच्या माध्यमातून क्षणार्धात शैक्षणिक यशाच्या पोस्ट प्रसारित होत आहेत. त्यामुळे मुलेही प्रेरित होऊन स्वकृती करत आहेत. शिक्षणामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या घडत आहेत, याचे पालकांना आणि समाजालाही महत्त्व कळत आहे. शिक्षणाविषयी समतोल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध करण्यासाठी सेल्फी विथ सक्सेसचा अधिकाधिक उपयोग होत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये शिक्षकांनी शिक्षकांचा पीएलसी अर्थातच, प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडन्ट ॲसेसमेंट व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे, गटातील प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचन करणे, आपल्याला आलेले यश गटासाठी शेअर करणे, वर्गात दैनंदिन अध्यापन आणि वर्गातील कृती गटामध्ये शेअर करणे, गटात होणाऱ्या चर्चेत सहभागी होणे, पोस्ट तयार करण्यासाठी स्पीच नोटसारख्या ॲपचा उपयोग करणे, सेल्फी विथ सक्सेसचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. शिक्षक आपापल्या आकलनानुसार आणि प्राप्त परिस्थितीनुसार या गोष्टी करत आहेत.

Indian Education System
Education Policy : पाचवी, आठवीत पास होण्याचे विद्यार्थ्यांवर बंधन

‘सेल्फी विथ सक्सेस’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना स्वतः शिकू देण्यास शिक्षक प्रेरित करतात. त्यामुळे सर्वच पाठ्यपुस्तकातील पाठ आणि पाठांतील महत्त्वाची माहिती-मुद्दे-प्रश्‍नोत्तरे-कविता रसास्वाद-प्रयोगशीलता-गणिती क्रिया आणि उदाहरणे -भौमितिक आकृत्या-तर्क-विचार-चिंतन आणि मनन करून विद्यार्थी स्वतः शिकण्यास एका नवीन शिक्षण पद्धतीची सुरुवात आता झालेली आहे.

मुलांना शिकण्याची-आव्हाने स्वीकारण्याची सवय आता चांगलीच झालेली आहे. एखाद्या दिवशी मी त्यांना आव्हाने देणे विसरले, तर मुले लगेच जवळ येतात व म्हणतात, ‘‘मॅडम, आजचे शिकण्याचे आव्हान द्या ना, आम्ही ते पूर्ण करून आणतो.’’ माझ्या मते, ‘‘आव्हानांमुळे मुले कोणत्याही गोष्टीकडे-शब्दाकडे चौकसपणे पाहून विचार करत आहेत.’’

मी जेव्हा लेकरांना ‘संपत्ती’ हा शब्द आव्हान म्हणून दिला आणि त्यांना या शब्दाचा अर्थ सांगा, असे सांगितल्यावर त्यांनी ‘संपत्ती’ म्हणजे धनदौलत हा सरळसरळ अर्थ सांगितला. शेतकऱ्यांची संपत्ती म्हणजे शेती-धान्य-पशू-पक्षी-काम करणारी माणसं, असा अर्थ सांगितला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ‘संपत्ती’चा अर्थ नैसर्गिक साधन संपत्ती (हवा-पाणी-जमीन इत्यादी) आणि आई-वडिलांच्या दृष्टीने ‘संपत्ती’ म्हणजेच गुणी आणि कर्तबगार लेकरंबाळं, अशी संपत्तीची माहिती दिली.

संतांच्या अनुषंगाने ‘संपत्ती’ म्हणजे संतांचे जीवन कार्य आणि ग्रंथसंपदा, असा संपत्तीचा अर्थ विद्यार्थ्यांनी सांगितला. म्हणजेच शब्द एक, मुले अनेक आणि विचार करण्याची शैली बहुविध आणि त्या शब्दाच्या अर्थाची व्यापकताही अधिक होत असल्याचे अनुभवाने कळून चुकले. महाराष्ट्रातील अशा अनेक शिक्षकांचे असेच अनुभव असल्याचे समजले. पूर्वी शिक्षण प्रणालीत शिक्षक जास्तीत जास्त प्रश्‍न विचारायचे आणि विद्यार्थी उत्तरे द्यायचे.

पण आता यामध्ये बदल करून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारण्यास सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळून विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती विकसित होण्यास या उपक्रमातून उपयोग होत आहे. वर्गातील सर्वच विद्यार्थी अध्ययनात कमी-मध्यम आणि जोरात गतिमान असतात.

या सर्वांना सहभागी करून घेत मी जेव्हा बघितले, की त्यांना शब्द दिल्यानंतर १ ते ६०० शब्द आणि वाक्ये निर्मिती त्यांनी केलेली आहे. या अभिव्यक्तीमुळे त्यांना नव अनुभूती मिळाली. पुस्तकात आणि पुस्तकाच्या बाहेर जाऊन निरीक्षण-कथन-मोठ्या माणसांशी चर्चा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ते स्वतः अभ्यासू आणि जिज्ञासू होत आहेत.

पाणी, माती, शेती, झाड, घर, गाव, शेतकरी, पृथ्वी, ग्रह, सूर्य, आरोग्य, रोग, माणूस, प्रदूषण, रंग, शाळा, अंधश्रद्धा, शासन, भ्रष्टाचार, शिक्षण, आई-वडील यांसारख्या अनेक शब्दांचा उपयोग करून, जास्तीत जास्त अर्थपूर्ण वाक्ये तयार करण्याचे कार्य सुरू आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढत आहे. नवीन ज्ञान-माहिती आणि नवनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना मिळत आहे. संकुचित विचार करण्याची वृत्ती नाहीशी होऊन त्यांच्यात सखोलपणा वाढत आहे.

अनेक बाबींचा सर्वंकष विचार करण्याचे सर्वांनाच पटत आहे. माझा ग्रामीण भागातील दैनंदिन अध्यापनाचा अनुभव आहे. त्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी-वातावरण आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा परिचय आहे. त्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन करून जास्तीत जास्त संधी देण्यावर मी काम करत आहे. कारण फक्त अनुभवाने नव्हे तर आलेल्या अनुभवांवर चिंतन-मनन करूनच योग्य शिक्षण होते. स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करून भविष्यवेधी शिक्षणाकरिता गतिमान शिक्षण महत्त्वाचे आहे.

(लेखिका प्राथमिक पदवीधर शिक्षिका आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com