Solapur News : शासनाचे महत्त्वाकांक्षी महाराजस्व अभियान मिशन मोडवर राबवावे

राज्यातील प्रत्येक शेतकरी, सर्व गावकरी समृद्ध व्हावेत, हे शासनाचे धोरण आहे.
Radhakrushna Vikhe Patil
Radhakrushna Vikhe PatilAgrowon

Solapur News : महाराजस्व अभियान हे शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान असून, त्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, हे अभियान अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर राबवावे, असे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी येथे दिले.

मातोश्री पाणंद रस्ते, पाणंद रस्ते, शिवरस्ते, शिवार रस्ते खुले करण्याबाबत व मोजणी करून सात-बारावर नोंद घेण्याबाबत आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उपविभागीय अधिकारी मनीषा आव्हाळे उपस्थित होते.

Radhakrushna Vikhe Patil
Milk Protest : राधाकृष्ण विखे पाटील सदोष मिल्कोमीटर आणि वजनकाटे वापरणाऱ्या दूध कंपन्यांवर छापे टाकतील का?

विखे पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील प्रत्येक शेतकरी, सर्व गावकरी समृद्ध व्हावेत, हे शासनाचे धोरण आहे. कृषी क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब आहे. यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता आहे.

शेत- पाणंद रस्ते हे सुद्धा अन्य महामार्गएवढेच महत्त्वाचे आहेत. मात्र किरकोळ वादातून मशागत, वाहतूक होत नाही. या दृष्टीने महाराजस्व अभियानातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला जाऊ शकतो.

पुढील तीन महिन्यांत यासंदर्भातील सर्व योजनांची परस्पर सांगड घालावी, संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यपद्धती निश्चित करावी व प्रक्रियेला चालना देऊन कामे पूर्ण करावीत.``

१७५ रस्ते वहिवाटीसाठी मोकळे

प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी सादरीकरण केले. जिल्ह्यात २६ जानेवारीपर्यंत गाव नकाशांप्रमाणे बंद झालेले २४३.४२ किलोमीटर अंतराचे ३८१ रस्ते अतिक्रमित होते.

पैकी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गतमहिनाअखेर १६.३५ किलोमीटरच्या २१ रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले आहे.

तसेच १७५ वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यात आले असल्याचे सांगितले. तर चारुशीला देशमुख-मोहिते यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मातोश्री पाणंद रस्त्यांबाबत सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com