Tendu Collection: हंगामात २०० कोटी रुपयांचे तेंदूपाने संकलन

Tendu Leaves Update: उन्हाळ्यात कमी कालावधीत अधिक लाभ मिळवून देणारा म्हणून तेंदूपाने संकलन हंगाम ओळखला जातो. पंधरा दिवसांच्या या हंगामात यंदा वनविभागाच्या नियंत्रणाखाली ३६ हजार ४३६ तेंदुगोणी संकलित करण्यात आली.
Tendu Collection
Tendu CollectionAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News: उन्हाळ्यात कमी कालावधीत अधिक लाभ मिळवून देणारा म्हणून तेंदूपाने संकलन हंगाम ओळखला जातो. पंधरा दिवसांच्या या हंगामात यंदा वनविभागाच्या नियंत्रणाखाली ३६ हजार ४३६ तेंदुगोणी संकलित करण्यात आली.

जिल्ह्यात वन विभागाच्या नियंत्रणाखालील पेसा व गैरपेसा क्षेत्रात गडचिरोली, वडसा व आलापल्ली या तीन वन विभागांत तेंदूपाने संकलित करण्यात आली. ४ ते १४ मे असा तेंदुपाने संकलनास सुरुवात झाली. बहुतांश गावांमध्ये १३ ते १८ मे दरम्यान तेंदुपाने संकलनाचा हंगाम संपला. जवळपास ८ ते १० दिवस तेंदुपाने संकलित करण्यात आली.

Tendu Collection
Tendu Leaf : मजुरांचा सुरक्षेशिवाय जंगलात तेंदूपत्ता संकलन

या कालावधीत अनेक कुटुंब ४० ते ६० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळवितात. कमी कालावधीत अधिक मजुरी त्यांना प्राप्त करता आली. ग्रामसभांकडून किती पोती (गोणी) तेंदुपाने संकलन झाले, याची आकडेवारी मात्र समोर आली नाही.

Tendu Collection
Tendu Leaf Income: तेंदूपाने संकलनातून यंदा सात कोटींचे उत्पन्न अपेक्षित

जिल्ह्यात सर्वाधिक तेंदूपाने संकलन ग्रामसभांकडून केले जाते. ग्रामसभांची तेंदूसंकलनाची उलाढाल १५० कोटींहून अधिक आहे. म्हणजे जवळपास २०० ते २१५ कोटींची उलाढाल तेंदूपाने संकलन हंगामात होते. वनविभागाच्या वनक्षेत्र घटकाच्या सभोवलताच्या ग्रामसभा पेसा पर्याय दोननुसार तेंदूपानाची विक्री केली होती.

त्यांचा तेंदूपाने संकलनाचा दर जास्त होता. यामुळे पेसा ग्रामसभांचे संकलन अधिक झाले. पर्यायाने वन विभागाच्या नियंत्रणाखाली सदर घटकात तेंदूपाने संकलन कमी प्रमाणात झाले आहे. अनेक मजुरांनी ग्रामसभांकडे तेंदूपानाची विक्री केली.

यंदाच्या तेंदूपाने संकलनासाठी प्रती गोणी ४ हजार २५० रुपये दर होता. त्यानुसार ४२५ रुपये प्रती शेकडा दर मिळाला. वनविभागाच्या नियंत्रणाखाली करण्यात आलेल्या तेंदूपाने संकलनात ५० कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल झाली. याद्वारे मजुरांच्या हाताला काम मिळाले.

३८७ गोणी संकलन

वडसा वनविभागातील नवरगाव घटकात २९६.८१० तसेच सिर्सी, कोरेगाव, गोठणगाव, दादापूर, कोहका या घटकातून ९०.५७० तेंदुगोणी संकलन झाले. वन विभागाच्या नियंत्रणात २ पेसा व २५ गैरपेसा क्षेत्रात तेंदूपाने संकलन झाले. यातून वनविभागाला सात कोटींची रॉयल्टी मिळाली. या र‍कमेतून खर्च वजा जाता उर्वरित रक्‍कम मजुरांना बोनस म्हणून दिला जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com