Mango Cultivation : शिराळ्यात आंबा लागवडीकडे कल

Mango Farming : आंबा लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळत असून हमखास उत्पादन मिळणारे पीक म्हणून शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंबा लागवडीकडे वाढता कल असल्याचे चित्र आहे.
Mango Farming
Mango FarmingAgrowon

Sangli News : आंबा लागवडीसाठी शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अनुदान मिळत असून हमखास उत्पादन मिळणारे पीक म्हणून शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंबा लागवडीकडे वाढता कल असल्याचे चित्र आहे. शिराळा हा डोंगरी तालुका आहे. बहुतांश भागात मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे.

अशी जमीन आंबा बागांसाठी उपयुक्त असते. तालुक्याच्या सर्व भागात माळरानावर तसेच उताराच्या शेतात शेतकऱ्यांनी आंब्याच्या बागा केलेल्या आहेत. सध्याच्या काळात अनेक शेतकरी एक व्यापारी पीक म्हणून आंबा लागवडीला महत्त्व देत आहेत. त्यामुळे तालुक्यात दिवसेंदिवस बागांची संख्या वाढत आहे.

Mango Farming
Mango Season : अंतिम टप्प्यातही हापूसला प्रतिडझन ४५० रुपये दर

विशेषत: लागवडीसाठी देवगड हापूस, केशर, पायरी यांसारख्या रोपांना शेतकरी प्राधान्य देत आहेत. तालुक्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आंब्याची फळे मुंबई, पुणे सारख्या बाजारपेठेत पाठवण्याची सोय आहे. तसेच अनेक व्यापारी सुद्धा बागांमध्ये येऊन आंब्याची फळे खरेदी करताना दिसत आहेत.

Mango Farming
Mango Season : सातपुड्यातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

असे आहे अनुदान

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून आंबा लागवडीसाठी १०० टक्के अनुदान दिले जाते. यासाठी शेतकऱ्याला सलग २० गुंठ्याच्या क्षेत्रात लागवड करावी लागते. खड्डे खोदणे, कलम लागवड, नांग्या भरणे, खते देणे, पीक संरक्षण अशा टप्प्यांवर हे अनुदान तीन वर्षांत दिले जाते तसेच बांधावरील लागवडीसाठी सुद्धा अनुदान मिळते.

आंबा बागेची एकदा निर्मिती केली की या बागेसाठी इतर पिकाप्रमाणे अधिक कष्ट करावे लागत नाहीत आणि उत्पादनही चांगले मिळते आर्थिक फायदा होतो.
- हरीराम खोत, शेतकरी, खवरेवाडी
आंबा लागवडीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा विचार करता शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळले पाहिजे व अधिक उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या फळबाग लागवडीची माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
- अरविंद शिंदे, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com