Orchard Fire : दहा एकरांतील आंबा, काजू बाग जळाली

Mango Cashew : मळगाव-सावळवाडालगत असलेल्या झिरंग परिसरात कोकण रेल्वेच्या ट्रॅकलगत असलेल्या बागायतीला बुधवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली.
Orchard Fire
Orchard FireAgrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील मळगाव-झिरंग (ता. सावंतवाडी) येथे रेल्वे ट्रॅकलगत लागलेल्या आगीत दहा एकरमधील आंबा, काजूची शेकडो झाडे जळाली. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

मळगाव-सावळवाडालगत असलेल्या झिरंग परिसरात कोकण रेल्वेच्या ट्रॅकलगत असलेल्या बागायतीला बुधवारी (ता. ८) सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. कडक ऊन आणि वाऱ्यामुळे आग परिसरात पसरली.

Orchard Fire
Pomegranate Orchard Fire : शॅार्टसर्किटमुळे डाळिंब बाग जळाली

गवत सुकलेले असल्याने आगीने त्वरित रौद्ररूप धारण केले. काही वेळातच आगीचा वणवा आठ ते दहा एकर क्षेत्रात पसरला. याबाबतची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून सावंतवाडी नगर परिषदेचा बंब मागविण्यात आला. बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास काही प्रमाणात यश आले. या आगीत सुमारे आठ ते दहा एकर क्षेत्रातील आंबा व काजूची शेकडो झाडे जळाली. या आगीत पाडुरंग हळदणकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com