Farmer Transportation Challenges: पंढरपूर तालुक्यातील तावशी- मारापूर मार्गावरील नदीच्या बंधाऱ्याला संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या बंधाऱ्यावरून दररोज दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, बंधाऱ्याच्या कडेला कोणत्याही प्रकारचे संरक्षणात्मक कठडे नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे..सध्या उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी कमी असली तरी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास हा धोका अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळी अथवा पावसाळ्यात दृश्यमानता कमी झाल्याने वाहनचालकांचा अंदाज चुकून वाहन थेट पाण्यात जाण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिला प्रवाशांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे..Bubli Lake Desilting: बुबळी तलावातील गाळ काढणे सुरू.स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे संरक्षक कठडे उभारण्याची मागणी केल्याचे सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना मजबूत लोखंडी कठडे, परावर्तित फलक तसेच इशारा दर्शविणारे फलक तातडीने बसवावे. अपघात होण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने संरक्षक कठडे उभारून नागरिकांच्या सुरक्षिततेची.Pawna Dam Strengthening: पवना धरण मजबुतीकरणाचा प्रश्न अधांतरी.हमी द्यावी, अशी मागणी तावशी व मारापूर परिसरातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे..तावशी-मारापूर बंधाऱ्यावरील कठड्याबाबत शेतकऱ्यांची मागणी प्राप्त झाल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर करून मान्यता घेण्याची प्रक्रिया राबविता येईल.- एस. डी.हलकुडे, उपविभागीय अधिकारी, जलसंपदा विभाग, मंगळवेढा.तावशी-मारापूर बंधाऱ्यावर संरक्षक कठडे नसल्यामुळे दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात हा धोका आणखी वाढणार असून, प्रशासनाने तातडीने कठडे बसवावेत.- अनिल वगरे, चेअरमन, प्रशांतराव परिचारक पतसंस्था, तावशी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.