Mumbai News : पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व समन्वयाने होण्यासाठी कृषी, पणन विभागाच्या कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना पेरणी ते विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळाल्याने शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास आणि शेतीमालाला भाव मिळेल, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. .मंत्रालयात पणन व कृषी विभागातील विविध प्रकल्पांच्या कामाच्या समन्वयाबाबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला कृषिमंत्री भरणे आणि पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह अधिकार उपस्थित होते..Agriculture Minister Dattatray Bharane : शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणारे काम करा: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे .श्री. भरणे म्हणाले, की पिकाची पेरणी ते प्रत्यक्ष उत्पादन अधिक होण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना करत असते. शेतकऱ्यांनी कोणत्या पिकाची पेरणी करावी जेणेकरून पिकाला विक्रीपश्चात अधिक भाव मिळेल. हवामान अंदाज, शेतीमालाची विक्री याबाबत मार्गदर्शन करावे यासाठी पीक काढणी मार्गदर्शक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येईल..पणन व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी समन्वयातून काम करावे. स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत भागीदारीतून उभारण्यात येणारी गोदामांची कामे करणे, समुदाय आधारित संस्थांना भागीदारी माध्यमातून विकेंद्रीत गोदाम उभारणे तसेच समृद्धी महामार्ग -ॲग्रो लॉजिस्टीक पार्क उभारण्यासंदर्भात कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल,’ असे त्यांनी सांगितले..Ajit Pawar: सोलापूरमधील पूरग्रस्त भागात अजित पवारांचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचं आश्वासन.श्री. रावल म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना शेतीमध्ये कोणते पीक घेतले तर योग्य फायदा मिळेल यासाठी कृषी व पणन विभागाकडून योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. स्मार्ट प्रकल्पांतर्गत ४ शेतकरी उत्पादक संस्था यांच्याबरोबर विकेंद्रित गोदामांची कामे लवकर पूर्ण करावीत. तसेच २२ जिल्ह्यांत ३५ तालुक्यांच्या ठिकाणी गोदाम उभारण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या कामालाही कृषी विभागाने गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले..बैठकीला सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, कृषी आयुक्त सूरज मांढरे, उपसचिव अं. सा. चंदनशिवे, अवर सचिव (पणन) अस्मिता पाटील, महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे सहव्यवस्थापक विनायक कोकाटे, दूरदृश्यप्रणालीद्वारे स्मार्ट प्रकल्पाचे संचालक हेमंत वसेकर, संचालक (विस्तार) रफिक नायकवडी, महाराष्ट्र राज्य वखार मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, कृषी संचालक सुनील बोरकर, इतर अधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.