
Rojgar Hami Yojana Ratnagiri News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) यंदा सलग चौथ्या वर्षी कोकण विभागात फळबाग लागवडीचे सर्वाधिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी विभागात सर्वाधिक म्हणजे चार हजार हेक्टर क्षेत्रात हे उद्दिष्ट गाठण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोकणात प्राधान्याने काही वर्षांपासून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. पाच हेक्टरच्या आतील व जॉब कार्ड असलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगामधून फळबाग लागवड केली जात आहे.
पाच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असलेल्या किंवा जॉब कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी राबविण्यात येत असलेली स्व. भाऊसाहेब प्रती फुंडकर फळबाग लागवड योजना कोरोनाच्या काळात बंद होती. ती योजनाही गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे.
त्यामुळे फळबाग लागवडीला रत्नागिरी जिल्ह्यात वेग येताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते.
पहिल्या वर्षी (२०१९-२०) ८ हजार हेक्टरवर, दुसऱ्या वर्षी (२०२१-२२) साडेआठ हजार हेक्टरवर, तर गतवर्षी (२०२२-२३) नऊ हजार हेक्टरपर्यंत फळबाग लागवड झाली. यंदा नव्याने साडेतेरा हजार हेक्टरवर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अडीचशे कृषी सहायक असून प्रतिकृषी सहायकांना इतर क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे. या वर्षभरामध्ये मागील वर्षांच्या तुलनेत अधिक फळबाग लागवडीचे कृषी विभागाने नियोजन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.