Tapi River Festival : खानदेशात तापी जन्मोत्सव उत्साहात

Tapi River : आषाढ शुद्ध सप्तमीला दरवर्षी तापी जन्मोत्सव साजरा केला जातो. शेकडो वर्षे खानदेशात हा उत्सव होत आहे.
Tapi River
Tapi RiverAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशची जीवनवाहिनी तापी नदीच्या जन्मोत्सव यंदाही उत्साहात झाला. खानदेशात गावांत तापी नदीला साडी अर्पण करण्यासह पूजन करण्याची परंपरा असून, विविध भक्तगण, शेतकऱ्यांनी तापी जन्मोत्सव साजरा केला. साडी - चोळी अर्पण करण्याचा मानही विविध कुटुंब, शेतकऱ्यांना मिळाला.

आषाढ शुद्ध सप्तमीला दरवर्षी तापी जन्मोत्सव साजरा केला जातो. शेकडो वर्षे खानदेशात हा उत्सव होत आहे. प्रकाशा (ता. शहादा) येथे केदारेश्‍वर महादेव मंदिरात सूर्यकन्या तापी मातेची मूर्ती आहे.

Tapi River
Tapi Burai Project : तापी-बुराई प्रकल्पाच्या ७९४ कोटी रुपये खर्चाला मान्यता

या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी विविध भागांतील शेतकरी, ग्रामस्थ, भक्तगण येतात. तापी नदीकाठ केळी, पपई व अन्य फळ पिकांनी समृद्ध आहे. पाण्याचे संकट या भागात आलेले नाही. तापी नदीने भरभरून दिले, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तापी जन्मोत्सव खानदेशात साजरा केला जातो.

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगरातील चांगदेव, रावेरातील निंबोल, भुसावळ, धुळ्यातील टाकरखेडा (ता. शिंदखेडा) नंदुरबारातील सारंगखेडा, प्रकाशा आदी गावांत तापी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गुजरातमधील तापी जिल्ह्यातील निझर व परिसरातही तापी जन्मोत्सव झाला. प्रकाशा येथे सर्वांत मोठा कार्यक्रम झाला.

Tapi River
Tapi Mega Recharge Scheme : ‘तापी मेगा रिचार्ज’ प्रकल्प हवेतच

प्रकाशातील गढी येथील दुर्गामाता मंदिरापासून तापी मातेच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील युवक, सुवासिनी, शेतकरी मंडळी सहभागी झाली. गोमाई - पुलिंदा व तापी नदीच्या संगमावर तापी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सुजालपूर (ता. नंदुरबार) येथील शेतकरी, ग्रामस्थांनी तापी मातेची मूर्ती आणली आहे. तापी नदीची महाआरती झाली.

यानंतर पेरावणी साडी - चोळी अर्पण करण्यात आली. या वेळी प्रकाशा येथील ग्रामस्थ, मान्यवर, संत, महंत उपस्थित होते. त्यात श्री श्री १००८ संत श्री तारादास महाराज, साध्वी जिज्ञासा, संत संतोष महाराज आदींचा समावेश होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com