
Solapur News : उक्कडगाव (ता. बार्शी) शिवारातील पठाडे तलावाजवळ तीन जनावरांवर हल्ला केल्यानंतर वाघाने कडकनाथवाडी येथे मुक्काम ठोकून, भूम हद्दीत प्रवेश केल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वाघाचा शोध घेण्यासाठी ताडोबा रेस्क्यू टीम आणि वनविभागाकडून शोधमोहीम सुरुच आहे. या पथकाकडून त्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. पण वाघ त्यांच्या अद्याप टप्प्यात आलेला नाही.
शुक्रवारी सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वाघाने येडशी अभयारण्यातून उक्कडगाव शिवारात येत ५० जनावरांच्या कळपावर हल्ला केला. या हल्ल्यात तीन जनावरे ठार झाली. रात्री साडे अकरा वाजता ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ कैद झाला. परंतु त्यानंतर तो पसार झाला.
ड्रोन व ट्रॅप कॅमेऱ्यांचा वापर वाघाचा मागोवा घेण्यासाठी येडशी अभयारण्य, उक्कडगाव, ढेंबरेवाडी तलाव परिसरात ड्रोनच्या साहाय्याने शोध सुरू आहे. तसेच वाघाच्या हल्ल्याच्या ठिकाणी लावलेल्या दोन ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्याचा वावर दिसून आला आहे.
त्यामुळे या भागात वाघ व बिबट्याचा वावर असल्याने स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (ता.१८) कडकनाथवाडी (ता. वाशी) परिसरात वाघाचे ठसे आढळून आले, तर हा वाघ भूमच्या दिशेने गेला असावा, असा वनविभागाचा अंदाज आहे. भूम वनविभागाने यासाठी विशेष सतर्कता घेतली आहे. उक्कडगाव परिसरात वाघ आणि बिबट्याच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनावरांचा सांभाळ कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. वनविभाग आणि ताडोबा रेस्क्यू टीमकडून वाघाचा शोध सुरूच आहे. तर नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावी आणि कोणतीही हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.