Disaster System : पावसाळ्यातील आपत्तीसाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

Monsoon Update : आगामी मॉन्सूनच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये. तसेच पावसाळ्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे.
flooding
floodingagrowon

Monsoon Buldanan News : आगामी मॉन्सूनच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये. तसेच पावसाळ्यातील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी दिले.

मॉन्सून पूर्व आणि उष्णतेच्या लाटेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

पावसाळ्याच्या दिवसात संभाव्य संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात धान्य पुरवठा उपलब्ध करावा. आरोग्य विभागाने सतर्क राहून जलजन्य आजाराला आळा घालण्यासाठी आवश्यक औषधीसाठा उपलब्ध ठेवावा.

वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी दुरुस्ती पथके तैनात करावीत. रस्ता वाहून गेल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. याबाबत बांधकाम विभागाने सतर्क राहून कार्यवाही करावी. सध्या सुरू असलेली पुलाची कामे ३० मेपर्यंत तत्काळ पूर्ण करण्यात यावीत.

flooding
Monsoon Update : यंदा मॉन्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता

धोकादायक असलेल्या धरणाची दुरुस्ती मॉन्सून सुरु होण्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी. अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकाची हानी झाल्यास कृषी विभागाकडून तत्परतेने कार्यवाही करावी. महावेदने बसविलेल्या मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्र सुस्थितीत असल्याची कृषी विभागाने खात्री करावी. तसेच नागरीकांनी दामिनी ॲपचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले.

धोका असणारी संभाव्य गावे

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या २०२२-२३ या कृती आराखड्यानुसार, धरण प्रभावित गावामध्ये कोराडी प्रकल्पांतर्गत नागझरी, पाचला, काबरखेड कल्याणा, मेहकर, मन धरणाखाली कोराडी, शहापूर, खामगाव, नळगंगा धरण प्रभावित शेलापूर, दाताळा, उमापूर, निंबारी, कुंड, मलकापूर ही गावे येतात.

तर ज्ञानगंगा शेजारी निमकवळा, तांदूळवाडी, वळती, खारखेड, अवधा बु. या गावांचा समावेश आहे. पलढग अंतर्गत तरोडा, जयपूर, कोथळी, खरबडी शिवणी अरमाळ प्रकल्पात बायगाव, मेंढगाव वान प्रकल्पात सोगोडा, लाखनवाडा, वडगाव, वानखेड, पातुर्डा, पेनटाकळी धरणात कळमेश्वर, जानेफळ बोथा प्रकल्प प्रभावती ढोरपगाव, काळेगाव, भालेगाव, येळगाव धरणाखाली येळगाव, सव, किन्होळा या गावाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com