Organic Farming : रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळा

Chemical Fertilizer : विलास तरे यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना विविध योजनांतून बळ देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळून शेती सुपीक ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
Organic Farming
Organic FarmingAgrowon
Published on
Updated on

Palghar News : वाढवण बंदर आणि विमानतळामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीकडे वळावे. सोबत बाजारपेठेचा अंदाज घेऊन लागवडीचे नियोजन करावे, असा सल्ला आमदार विलास तरे यांनी शेतकऱ्यांना दिला.

खरीप हंगामपूर्व कार्यशाळेचे पालघरमध्ये आयोजन केले होते. या वेळी तालुका कृषी अधिकारी सतीश बागुल, आत्माच्या ममता कांबळे, कृषी शास्त्रज्ञ दहीफळे, मंडळ कृषी अधिकारी अजय हुले, कृषी सहाय्यक आणि कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

विलास तरे यांनी मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना विविध योजनांतून बळ देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळून शेती सुपीक ठेवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीमधून रोजगाराच्या मोठ्या संधी : डॉ. सुधीर तांबे

भातशेतीव्यतिरिक्त आंबा, काजू, जांभूळ, तसेच फुलशेतीकडे वळण्याची गरज आहे. वनपट्टे असलेल्या जमिनीमध्ये बांबू आणि आंबा लागवड करावी. तालुक्यात नऊ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्यामुळे ते लागवडीखाली आणण्यासाठी नियोजन करावे.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतमाल उत्पादनातून वाढविले नफ्याचे मार्जिन

भातशेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने शेती करावी. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना योजनांची माहिती नसते. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना शिक्षित केले पाहिजे, असे तरे यांनी म्हटले आहे. तालुक्यात पाऊस भरपूर असला तरी सिंचन सुविधा अपुऱ्या आहेत. खरीप हंगामाच्या नियोजनासाठी १ ते ३१ मेपर्यंत २२४ गावांमध्ये एकूण ४४८ बैठका घेतल्या जाणार आहेत, असे सांगण्यात आले.

भविष्यात यंत्रांचा वापर

भातशेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. याआधी ५२ हेक्टरवर भाताची लावणी करण्यात आली; परंतु खर्चामुळे शेतकरी इच्छुक नसतात; परंतु यंत्रांमुळे उत्पादनात वाढ होत असल्याने भविष्यात यंत्रांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती बागुल यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com