Swabhimani Shetkari Sanghatana : शेतीचे वीज वेळापत्रक बदलासाठी हुपरीत ‘स्वाभिमानी’ आक्रमक

Electricity schedule for agriculture : तीन महिन्यांपासून असलेले शेतीसाठीचे वीज वेळापत्रक गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाणीसाठा करून ठेवणे अडचणीचे झाले आहे.
Agriculture Electricity
Agriculture ElectricityAgrowon

Kolhapur Electricity News : तीन महिन्यांपासून असलेले शेतीसाठीचे वीज वेळापत्रक गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाणीसाठा (Water Stock) करून ठेवणे अडचणीचे झाले आहे.

त्यामुळे वीज वेळापत्रक बदलावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे येथे महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. संतप्त शेतकऱ्यांनी रखरखत्या उन्हात दोन तास ठिय्या आंदोलन केले.

आंदोलकांचा रुद्रावतार पाहून वीज अधिकाऱ्यांनीही उन्हात बसून त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळी अकराच्या सुमारास महावितरण कार्यालयासमोर एकत्र येत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. उन्हातच ठिय्या मांडला. वीज अभियंता एस. डी. मंगसुळे यांनी आंदोलकांना कार्यालयात येण्याचे आवाहन केले.

Agriculture Electricity
Solapur Electricity Supply Problem : शिरापूर योजनेला वीज वितरणकडून ‘खो’

मात्र त्यास नकार देत मागणी मान्य झाल्याशिवाय जागेवरून न उठण्याचा निर्धार केला. त्यामुळे अभियंता मंगसुळे व कसबे यांनी आंदोलकांशी उन्हात बसून चर्चा केली.

रात्री नऊ ते पहाटे पाचऐवजी रात्री अकरा ते सकाळी सात या वेळेत वीजपुरवठा करण्याची मागणी करून निवेदन सादर केले. मागणीसंदर्भात वरिष्ठ अधिकारी पातळीवर ऑनलाईन पद्धतीने तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन अभियंता मंगसुळे व कसबे यांनी दिले.

आंदोलनात तालुकाध्यक्ष राजाराम देसाई, सूर्यकांत पाटील, शहराध्यक्ष अशोक बल्लोळे, प्रभाकर इंग्रोळे, विवेक रायबागकर, हनुमंत आपटे, घनश्याम गायकवाड, चंद्रकांत ठोंबरे, राजेंद्र बेडगे आदी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com