Milk Measurement : दूध संस्थांतील चुकीच्या कामांना वैधमापन शास्त्र विभागाचे प्रोत्साहन; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Milk Measurement Incorrect : वजन काट्यांमधील अचूकता व काटामारी थांबविण्याकरिता वैधमापन शास्त्र विभागाने परिपत्रक काढून नवीन नियमावली जाहीर केली. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही.
Milk Measurement
Milk MeasurementAgrowon
Published on
Updated on

Kolhapur Milk Production : दूध संस्थांतील चुकीच्या कामांना वैधमापन शास्त्र विभाग प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने विभागाचे सहाय्यक नियंत्रक दत्तात्रय पवार यांना सोमवारी (ता.२३) धारेवर धरले.

भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करुन काटामारी करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी अधिकाऱ्यांचा थेट कार्यालयाबाहेर समाचार घेतला.

पाटील म्हणाले, ‘वजन काट्यांमधील अचूकता व काटामारी थांबविण्याकरिता वैधमापन शास्त्र विभागाने परिपत्रक काढून नवीन नियमावली जाहीर केली. निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. बेकायदेशीर व नियमबाह्य वजन काटे बाजारात असून, दूध संस्थांमधील वजन काट्यांना कुणीही कसेही फेरफार करतात. दूध उत्पादकांचे रोज कोट्यवधी रुपयांचे दूध काटामारीने जाते.’’

वाहन काटे पडताळणीसाठी क्षमतेच्या ५० टक्के मानक वजने उपलब्ध नसताना इलेक्ट्रॉनिक वे ब्रिज पडताळणी कशाच्या आधारे केली? दूध संस्थांमधील १०० ग्रॅम ॲक्युरसीच्या बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांना परवानगी का दिली? नियमबाह्य बेकायदेशीर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे प्रत्यक्षात १०० ग्रॅम ॲक्युरसी प्रमाणात असताना १० ग्रॅम ॲक्युरसी म्हणून का प्रमाणीत केले?

Milk Measurement
Milk Subsidy : गायीच्या दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ

सीलिंग ॲक्टचे उल्लंघन करून काटे का दिले जातात? भरारी पथकाने साखर कारखाने तपासणी करताना दिलेल्या एसओपीशिवाय विसंगत पद्धत का वापरली? भरारी पथकाने दोन तासांत साखर कारखान्यातील पाच ते सहा वे ब्रिज कसे तपासले? असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले.

कार्याध्यक्ष राहुल पाटील, महादेव कोईगडे, धनराज आमते, नागनाथ बेनके, रणजित देवणे, विवेक मिठारी, बाबूराव शिंदे, योगेश जगदाळे उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com