Sustainable Agriculture : जमीन सुपीक राहिली तरच शाश्वत शेती करणे शक्य

द्राक्ष शेतीचा विस्तार होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा प्रति एकरी आर्थिक नफा वाढला पाहिजे. त्यासाठी जमीन सुपीक (Soil Fertility) राहिली तरच शाश्वत शेती करणे शक्य होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
Sustainable Agriculture Guidance
Sustainable Agriculture GuidanceAgrowon
Published on
Updated on

Nashik News : द्राक्ष शेतीचा विस्तार होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा प्रति एकरी आर्थिक नफा वाढला पाहिजे. त्यासाठी जमीन सुपीक राहिली तरच शाश्वत शेती करणे शक्य होणार आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

त्यामुळे शेतीच्या अनुषंगाने माती आणि पाणी परीक्षण करणे गरजेचे आहे. त्यातून सेंद्रिय कर्ब व उपयुक्त जिवाणू वाढतील याकडे लक्ष दिले जावे, असा सल्ला ‘यारा फर्टिलायझर्स’चे कृषिविद्यावेत्ता विकास खैरनार यांनी केले.

‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर चर्चासत्रे घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून निफाड तालुक्यातील उगाव येथे बुधवारी (ता. १९) ‘ॲग्रोवन’ आयोजित यारा फर्टिलायझर इंडिया प्रा. लि. प्रायोजित व ओम गायत्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने ‘द्राक्ष एप्रिल छाटणी अन्नद्रव्य व्यवस्थापन’ या विषयावर ‘ॲग्रो संवाद’ चर्चासत्र पार पडले.

या वेळी निफाड तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक रामनाथ शिंदे, मंडळ कृषी अधिकारी जी. बी. शिंदे, शेतकरी प्रतिनिधी खंडेराव मापारी, ओम गायत्री उद्योग समूहाचे अध्यक्ष मधुकर गवळी, यारा फर्टिलायझर्सचे नाशिक विभागीय व्यवस्थापक केशव बरकले आदी उपस्थित होते.

Sustainable Agriculture Guidance
Sustainable Agriculture : पर्यावरणपूरक, शाश्‍वत शेतीसाठी आंतरपीक पद्धती फायद्याची

खैरनार म्हणाले, की द्राक्ष वेलीची उत्पादकता ही प्रामुख्याने छाटणीच्या हंगामापासून केलेल्या अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. खरडछाटणी पश्चात गुणवत्तापूर्ण द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत अन्नसाठा झाल्यास पानांची गुणवत्ता टिकते.

त्यासाठी अन्नद्रव्यांचा संतुलित प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवर चकाकी गुणवत्ता यामध्ये जागतिक पातळीवरील द्राक्ष उत्पादक देशांच्या तुलनेत आपण मागे आहोत त्यामुळे गुणवत्ता वाढवण्याच्या संधी असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

या वेळी तालुका कृषी अधिकारी यांच्या हस्ते श्री. शिवाय महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालिका भारतीय मोरे व त्यांच्या सहकारी तसेच सेंद्रिय शेतीत भरू काम करणाऱ्या श्री श्री फळे व भाजीपाला शेतकरी गटाच्या सन्मान या वेळी करण्यात आला.

कार्यक्रमासाठी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप बच्छाव, कृषी सहायक पुरुषोत्तम वैष्णव यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ‘ॲग्रोवन’ नाशिकचे प्रतिनिधी मुकुंद पिंगळे यांनी तर आभार रोहन कोर यांनी मानले.

Sustainable Agriculture Guidance
Sustainable Agriculture : भारतीय शेतीच्या शाश्वततेसाठी एकात्मिक शेती पद्धती फायदेशीर

विषमुक्त अन्नाची मागणी वाढती

विषमुक्त अन्नाची मागणी वाढत आहे. त्यामुळे रेसिड्यू फ्री द्राक्ष उत्पादनाच्या अनुषंगाने रसायनांचा वापर मर्यादित करावा.

मात्र शेतीत वाटचाल करताना सल्लागारांच्या भरवशावर न राहता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः शेतीचे डॉक्टर व्हावे व त्यातून आर्थिक जीवनमान सुधारावे, असे मत तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे यांनी मांडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com