Political Meeting: ‘राष्ट्रवादी’च्या खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Political Update: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आठ खासदारांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत विविध प्रश्नांसह खासदारांच्या मतदारसंघांशी संबंधित विषयांवर सुमारे १५ मिनिटे चर्चा झाली.