Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस; उत्तरासाठी २ आठवड्यांची मुदत

Thackeray vs Shinde : विधानसभेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवले आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.
Rahul Narvekar
Rahul NarvekarAgrowon
Published on: 
Updated on: 

16 MLA Disqualification Case : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस पाठवले आहे. यामध्ये नार्वेकर यांना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे

Rahul Narvekar
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षावरील सलग सुनावणी १४ फेब्रुवारीपासून

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा मागील एक वर्षांपासून तिढा कायम आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावर त्यांनी पुरेशा वेळात यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, कोर्टाच्या निकालाला ३ महिने उलटून गेले तरीही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Rahul Narvekar
Disqualification of 16 MLAs : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांना विधानसभा अध्यक्षांकडून नोटीस जारी

शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत याचिका दाखल केली होती. दरम्यान, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांना आपले म्हणणे मांडण्यास सांगितले. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातही आज सुनावणीस सुरुवात झाली. न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांना आपले म्हणणं मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.  त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

त्यात राष्ट्रवादीमध्येही अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेसारखाच संघर्ष निर्माण झाला आहे. सध्या राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून गटनेता आणि प्रतोद यांच्या केलेल्या वेगवेगळ्या नियुक्त्यांमुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com