Raju Shetty : देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. यामुळे देशातील ५ कोटी ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून दिली आहे. .देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यावरून जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण न करता पर्यायी इंधनाच्या वापरासाठी मुभा द्यावी, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांनी सुनावणी घेतली आहे. या सुनावणी दरम्यान याचिका फेटाळून लावण्यात आली आहे..शेतकऱ्यांना फायदा काय?या निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना थेट लाभ झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला आहे. ऊस, मका आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल आहे. इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योग स्थिरावल्यामुळे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाल आहे. तसेच यामुळे दरवर्षी ४० हजार कोटी थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहेत..राजू शेट्टी म्हणाले, "देशातील क्रूड ऑईल व्यापारी, काही परदेशी बनावट गाडीच्या कंपन्या यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्यात येवू नये, अशी मागणी केली होती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने याचिकां फेटाळून लावली आहे." असे त्यांनी सांगितले..सध्या देशात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण केलं जातं. त्यामुळे उसापासून आणि धान्यांपासून १ हजार ६८५ कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन घेतलं जातं. परंतु देशातील मुठभर क्रूड ऑईल व्यापारी आणि काही वाहन कंपन्या स्वत:च्या स्वार्थासाठी इथेनॉलबाबत गैरसमज पसरवत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले..तसेच ब्राझील अमेरिका यासारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये इंधनात सर्रास इथेनॉलचा वापर केला जात असताना भारतामध्ये त्यावर बंदी घालणे म्हणजे कुटनीतीचा भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेऊन भारताच्या अर्थव्यवस्थेबरोबरच ग्रामीण, पर्यावरण व कृषी क्षेत्राला दूरगामी फायदे होणार असल्याचे शेट्टी म्हणाले..Ethanol Benefits: ‘इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना मिळाले एक लाख कोटी’.यावेळी शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांकडे लक्ष वेधलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल धोरणाला चालना दिल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये परकीय चलनाची १ लाख ४४ हजार कोटी रुपयांची बचत झाली. इथेनॉल वापरामुळे देशात जवळपास ७३६ लाख टनांनी कार्बन उत्सर्जन घटलं असून ३० कोटी झाडे लावण्याच्या बरोबरीत आहे. असेही शेट्टी यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.