Rajmata Jijau Jayanti : राजमाता माँ जिजाऊंना सूर्योदयी मानवंदना

Jijamata Birth Anniversary : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजवाड्यात जन्मस्थळी हजारोंनी अभिवादन केले.
Jijau Jayanti
Rajmata JijauAgrowon
Published on
Updated on

Buldana News : राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १२) मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजवाड्यात जन्मस्थळी हजारोंनी अभिवादन केले. प्रामुख्याने सूर्योदयी जिजाऊंच्या वंशजांनी तसेच विविध लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी पूजन करीत अभिवादन केले.

सूर्योदयी माँ जिजाऊ यांच्या महापूजेने सोहळ्याची सुरुवात झाली. महाराष्ट्रासह देशभरातून जिजाऊ भक्त मातृतीर्थ नगरीत नतमस्तक होण्यासाठी दाखल झालेले होते. जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी मातृतीर्थ नगरी सज्ज झाली आहे.

रविवारी सूर्योदयावेळी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यामध्ये माँ जिजाऊ यांच्या जन्मस्थळी महापूजा झाली. राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज, तसेच मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सपत्नीक पूजा केली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, अधिकारी हे नतमस्तक झाले.

Jijau Jayanti
Rajmata Jijau Birth Anniversary : राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला रविवारपासून सुरुवात!

त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले.

Jijau Jayanti
Jijau Jayanti Celebration : सिंदखेडराजा येथे आज ४२७ वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा

मंत्र्यांचीही हजेरी

जिजाऊ जयंतीदिनी राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर, केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी राजवाड्यातील जन्मस्थळी अभिवादन केले. जिजाऊंच्या जन्मस्थळाचा आगामी वर्षभरात कायापालट झालेला बघायला मिळेल. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, असे आश्‍वासन या वेळी बोलतान मंत्री फुंडकर यांनी दिले.

जिजाऊ सृष्टीवर मुख्य सोहळा

सिंदखेडराजा येथे दुपारी दोन वाजता जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मराठा सेवा संघाचे संस्थापक अॅड. पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांच्यासह मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com