Kolhapur Sugarcane : ऊस वाहतूक ठेकेदाराने उचललं टोकाचं पाऊल; कोल्हापुरातील घटना, कारखाना अधिकाऱ्यांवर आरोप

Sugarcane Transport : ऊस वाहतूक ठेकेदार धनाजी यादव याने राधानगरी तालुक्यातील फराळे ओंकार साखर कारखान्याकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी २०२३-२४ मधील गळीत हंगाम १२ लाख ०६ हजार रुपये उचल घेतली होती.
Kolhapur Farmer
Kolhapur Farmeragrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane : ऊस तोडणी मुकादमाने केलेली आर्थिक फसवणूक, कारखान्याचे शेती अधिकारी, कर्मचारी यांच्या जीवघेण्या त्रासाला कंटाळून नैराश्यातून पंडीवरे (ता. भुदरगड) येथील धनाजी बापूसो यादव (वय ३४) या तरुण ऊस वाहतूक ठेकेदाराने जंगलात गळफास घेऊन रविवारी (ता.२४) आत्महत्या केली. या प्रकरणी भुदरगड पोलिसांनी सागर देसाई, बाबुराव देसाई (दोघेही रा. निळपण, ता. भुदरगड), फराळे ओंकार शुगर मिलचे शेती अधिकारी समीर व्हरकट (रा. नरतवडे), संजय एकल (रा. सरवडे, ता. राधानगरी) यांच्या विरोधात सोमवारी उशिरा (ता.२५) गुन्हा दाखल केला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक ठेकेदार धनाजी यादव याने राधानगरी तालुक्यातील फराळे ओंकार साखर कारखान्याकडून ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी २०२३-२४ मधील गळीत हंगाम १२ लाख ०६ हजार रुपये उचल घेतली होती. या उचलेतील ४ लाख रुपये आणि २०२१-२२ मधील २ लाख ५१ हजार रुपये असे एकूण ६ लाख ५१ हजार रुपये मुकादम रामेश्वर राठोड (रा. नवहाटी तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी) याकडे शिल्लक होती. इतकी उचल देणे बाकी असताना मुकादम रामेश्वर राठोड याने निळपण येथील सागर शामराव देसाई यास तोडणी मजूर पुरविले. धनाजी याने त्या मुकादमकडे पैशाचा तगादा लावला असता सागर देसाई याने जीवे मारण्याची धमकी दिली. यातून एकमेकांविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाले.

Kolhapur Farmer
Kolhapur Sugarcane Season : कोल्हापूर विभागात ३० साखर कारखाने सुरू; साडेपाच लाख टन गाळप

कारखान्याकडून उचललेल्या रकमेसाठी फराळे कारखान्याचे शेती अधिकारी समीर व्हरकट आणि कर्मचारी संजय एकल याने धनाजी यांचा ट्रॅक्टर ओढून नेला. 'मिळेल तसे पैसे भरतो आणि माझा ट्रॅक्टर परत द्या', अशी मागणी धनाजी याने साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी याला कसलीच दाद दिली नाही. या सर्व त्रासाला कंटाळून धनाजी यादव याने जंगलात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची फिर्यादीत दिलेली माहिती पोलिसांनी दिली.

आत्महत्येपूर्वी सोशल मीडियात चिठ्ठी व्हायरल केली

वाहतूक ठेकेदार सागर देसाई त्याचा चुलता बाबुराव देसाई, फराळे ओंकार साखर कारखान्याचे शेती अधिकारी समीर व्हरकड, संजय एकल यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सोशल मीडियावर धनाजी यादव याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हायरल केली. याबाबतची तक्रार भाऊ तानाजी यादव यांनी पोलिसांत दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com