Sugarcane Research Center : कोईमतूरच्या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातही ऊस संशोधन केंद्र

Sugarcane Research : ऊस संशोधन संस्था कोईमतूरच्या धर्तीवर राधानगरीतील कृषी संशोधन केंद्रात उभारण्यात येणार आहे.
Sugarcane Research Center
Sugarcane Research Centeragrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugarcane Research Center : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथे ऊस संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. ऊस संशोधन संस्था कोईमतूरच्या धर्तीवर राधानगरीतील कृषी संशोधन केंद्रात उभारण्यात येणार आहे. यामध्ये ऊस संकरीकरण संच उभारणी करून ऊस संशोधन बळकटीकरण योजना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रस्तावित केली आहे.

यामुळे आगामी काळात या केंद्रातून अधिकाधिक ऊस संशोधनातून हवामानाशी अनुकूल शाश्वत उत्पादनक्षम राज्यातील वाणांची निर्मिती करण्यात येणार आहे. भरीव निधी आणि यंत्रणा उपलब्धतेतून ऊस संशोधनाची व्यापकता वाढीच्या दृष्टीने याचे काम चालणार आहे.

सध्या पाडेगावांतील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. दरम्यान याच धर्तीवर राधानगरीचे हवामान ऊसाला फुलोरा येण्यास उपयुक्त असल्याने, विद्यापीठाच्या निर्देशानुसार येथील कृषी संशोधन केंद्रात एक दशकापूर्वी ऊस संशोधन सुरू झाले.

मात्र, ऊस फुलोरा येण्याचा कालावधी एक ते दीड महिन्याचा, नर व मादी फुलोरा समरूप प्राप्त न झाल्याने संकरीकरण मर्यादित केले जाते. अधिकाधिक ऊस संशोधन करण्यासाठी ऊस संकरीकरण संचाच्या उभारणीतून संशोधन बळकटीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. प्रस्तावानुसार जवळपास साडेतीन कोटींचा खर्च अपेक्षित असला तरी हा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

बळकटीकरण प्रस्ताव उद्दिष्टे

उसाचे अधिक उत्पन्नक्षम, साखर उतारा अधिक, लवकर पक्व होणाऱ्या जैविक घटक प्रतिकाररक्षक वाणांची निर्मिती, मर्यादित काळात अधिकाधिक ऊस संकरीकरण प्रक्रिया करणे, उपलब्ध जनुकांचा त्याच्या वैशिष्ट्यानुसार संकरित करण्यासाठी वापर.

पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून अद्याप उसाचे १६ नवीन वाण विकसित केले आहेत. यातील १४ वाणांची निर्मिती कोईमतूर येथे जाऊन केलेल्या संकरीकरणातून झाली आहे. ऊस संकरीकरण संच उभारणीतून केंद्राच्या बळकटीकरणाची गरज अधोरेखित झाली. राधानगरी कृषी संशोधन केंद्राबरोबरच पाडेगाव केंद्राचाही प्रस्तावात समावेश आहे.

कोईमतूर धर्तीवर पाडेगाव आणि राधानगरीतील प्रस्तावित ऊस संकरीकरण संच उभारणी करून संशोधन बळकटी करणारे आवश्यक ऊस संकरीकरण केले जाईल. संकरीकरणातून मिळणारे संकर चाचणी प्रयोगात समाविष्ट विशेष गुणधर्माप्रमाणे पुढील उद्दिष्ट पूर्तीसाठी वापरले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com