Sugarcane of Farmers : उसाबरोबर सभासद वाळतोय! तर साखर कारखान्याचा फिल्डमन म्हणजे चहापेक्षा किटली गरम

Sahkari Sakhar Karkhana : कारखान्याचे फिल्डमन म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशीच अवस्था होऊन बसली आहे.
Sugarcane of Farmers
Sugarcane of Farmersagrowon
Published on
Updated on

Kolhapur Sugar Factories : कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकाराचे जाळे असल्याने जवळपास २० सहकारी साखर कारखाने आहेत. या सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण चालते. जिल्ह्यातील सर्वच कारखान्याचे चेअरमन हे आजी माजी आमदार खासदार असल्याने त्यांचीच कारखान्यांवर मक्तेदारी चालते.

निवडणूक लागल्यानंतर सर्वसामान्य सभासदांचा असणारा साखर कारखाना ऊस तोडणीच्यावेळी मात्र सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतला किंवा त्यांच्या नातेवाईकांचाच असतो, असेच चित्र जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान यंदा पाऊस कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घटण्याची भिती पहिल्यापासून व्यक्त केली जात होती. यामुळे जिल्ह्यातील सर्वच कारखाने उसाची पळवा पळवी करताना दिसत आहेत. असे असले तरी काही कारखान्यांमध्ये सभासदांना वेळेत ऊस तोड मिळत नसेल तर कारखाने कोणाचा ऊस गाळप करत आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात २० सहकारी तर ३ खाजगी साखर कारखाने आहेत. बहुतेक कारखाने १७ महिन्यांपूर्वी केलेल्या आडसाली लागणीचा ऊस गाळप करत असतात. परंतु यंदा कारखान्यांच्या निवडणुकांचा डाव म्हणून की काय तब्बल १६ महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्वसामान्य ऊस उत्पादकांना पाळीपत्रकानुसार ऊस तोड दिली जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

प्रत्येक निवडणुकीत सर्वसामान्य सभासदांचा कारखाना टिकला पाहिजे. त्यांच्या उसाचे वेळेत गाळप झाले पाहिजे, म्हणून आश्वसन देणारे आता त्याच सर्वसामान्य सभासदांची गाठ घ्यायला तयार नसल्याचे चित्र आहे. तर कारखान्याचे फिल्डमन म्हणजे चहा पेक्षा किटली गरम अशीच अवस्था होऊन बसली आहे. कारखान्याची गावपातळीवरील यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी ही फिल्डमन लोकांची असते परंतु ते आपल्या मर्जीनुसार काम करत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत असतात.

बऱ्याच कारखान्यांवर पाळीपत्रकाबाहेर जाऊन ऊस तोड दिल्या जात आहेत. ज्या-त्या कारखान्यांच्या शेतकऱ्यांनी याची संबंधित शेती अधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. मात्र, अशा तोडण्यांबद्दल ठोस उत्तर देण्यास शेती अधिकारीही धाडस करत नाहीत. शेतात असणारा ऊस वेळेत तोडला जात नसल्याने त्याचे वजन तर कमी होतेच; पण रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, बाजरीसारखी पिकेही घेता येत नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना दाद कोणाकडे मागायची हाच मोठा प्रश्न पडला आहे.

Sugarcane of Farmers
Sugarcane Season : ऊस गळीत हंगाम लांबणीचा शेतकऱ्यांना फायदा की राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न?

ऊस लागणीला चौदा महिने पूर्ण झाले. शेतात उभा ऊस वाळू लागला आहे. कारखान्याचे शेती अधिकारी, चिटबॉय यांची भेट घेऊन त्यांना वाळलेल्या उसाचा मोबाईलवर व्हिडिओ दाखवले. तरीही, त्यांना त्याचे काहीही घेणे-देणे नसल्यासारखे वागत आहेत. कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी नातेवाईक सोडून इतरांनाही ऊस तोडी वेळेत दिल्या पाहिजेत. - दादासाहेब पाटील, ऊस उत्पादक.

आम्ही संस्थेचे पाणी घेऊन शेती करतो वेळेत ऊस गेला नसल्याने त्याला पाणी देता येईना झाले आहे. कारखान्याच्या प्रत्येक अधिकारी आणि शेती अधिकाऱ्यांना भेटून आलो तर आज- उद्याची उत्तरे मिळत आहेत. - शकर जाधव, ऊस उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com