Kolhapur News: साखर हंगाम सुरू होताच भुदरगड तालुक्यातील अनेक भागांत ऊसतोडीची लगबग वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ऊस उत्पादक शेतकरी आपल्या मालाला अधिक दर मिळावा, या अपेक्षेने जादा भाव जाहीर करणाऱ्या कारखान्यांकडे ऊस घालवण्याचा कल दाखवत आहेत. .केंद्र सरकारकडून निश्चित केलेल्या एफआरपीपेक्षा प्रतिटन ३०० ते ५०० रुपये जादा दर देण्याची तयारी काही कारखान्यांनी दर्शविल्याने शेतकऱ्यांकडून त्या कारखान्यांना मोठी मागणी वाढली आहे. जास्त दर देणारे कारखाने ऊस वाहतुकीसाठी अतिरिक्त सोयीसुविधा, जलदतोडी यांसारख्या योजना जाहीर करत असल्याने शेतकऱ्यांचा त्यांच्यावर अधिक विश्वास बसत आहे.Sugarcane Price Cut: प्रतिटनामागे १५ रुपयांची कपात...! 'हा तर शेतकऱ्यांच्या उसाच्या पैशावर दरोडा', राजू शेट्टींचा आरोप, रोहित पवारांचाही सरकारवर हल्लाबोल .काही भागांत तर शेतकरी आपल्या ऊसतोड पथकांना जादा दर देणाऱ्या कारखान्याकडे वळवत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत तज्ज्ञांचे मत आहे की, वाढती उत्पादनखर्च, मजुरी, वाहतूक खर्च आणि खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी अधिक दराची मागणी करत आहेत. त्यामुळे जादा पैसे देणाऱ्या कारखान्यांना प्राधान्य मिळणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहे.दरम्यान, आगामी काही दिवसांत ऊसपुरवठा कसा बदलतो आणि कारखान्यांमध्ये स्पर्धा किती वाढते, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे..Sugarcane Cutting : ऊस तोडणीमुळे वाढ्यांना मागणी ; देवणी तालुक्यातील चित्र, पशुपालकांना दिलासा.ऊस उत्पादकही एकाच गट नंबरमधील केलेल्या ऊस लावणीची नोंद अन्य साखर कारखान्यांकडे करतात व जादा दर देणाऱ्या साखर कारखान्यांकडेच ऊस पाठवितात. त्यामुळे यंदा जादा दर देणारे साखर कारखाने आपले गाळप उद्दिष्ट सहज साध्य करणार आहेत. कमी दर देणाऱ्या साखर कारखानदारांना मात्र आपले गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सध्या साखर कारखाने ऊसदर देत आहेत. मात्र वाहतूक यंत्रणेत हे कारखाने कमी पडत आहेत. .त्यामुळे कारखान्यांनी तोडणी, वाहतूक यंत्रणा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून होत आहे. गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही कारखान्यांनी गळीत हंगामाच्या सुरुवातीलाचउसाची पळवापळवी केली. त्यामुळे कमी दर देणाऱ्या साखर कारखान्यांचे गाळप उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.