Sugarcane Crop Care: खानदेशात ऊस पिकाची लागवडही बऱ्यापैकी आहे. पीकस्थिती बरी आहे. नंदुरबारात सर्वाधिक ऊस पीक असून, पिकात मध्यंतरी पांढरी माशी व अन्य किडींची समस्या होती. त्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळविले. पीक बऱ्यापैकी असून, उष्णता वाढल्याने सिंचनासह अन्य बाबींची कार्यवाही शेतकरी करीत आहेत. .नंदुरबारातील तळोदा व शहादा तालुक्यात पाण्याची उपलब्धता पाहता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी व सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. शहादा तालुक्यात सुमारे आठ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. खानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबारात सुमारे 16 हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक क्षेत्र चार ते सहा हजार हेक्टरदरम्यान होते..Sugarcane Care: उन्हाळ्यात उसाची वाढ टिकवण्यासाठी काय करावे?.शेतमालाला खर्चाच्या तुलनेने मिळणारे कवडीमोल दर, मजूरटंचाई यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला पसंती दिली आहे. खानदेशात तळोदा, शहादा, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, चाळीसगाव, यावल आदी तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर कूपनलिकांच्या सहाय्याने उसाची शेती केली जाते. केळी, पपई, ऊस, कापूस आदी पिकांसह विविध कडधान्यांचे उत्पादन घेतले जाते; परंतु गेल्या काही वर्षांपासून मजुरांची सातत्याने होणारी टंचाई तसेच मजुरीचे दर वाढल्याने उत्पादित मालाला लागणारा खर्चही वाढला आहे; परंतु त्या मानाने अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे..Sugarcane Summer Management : उन्हाळ्यातील ऊस व्यवस्थापन.यात उसाला काहीअंशी मजुरी कमी लागते, तसेच कीटकनाशकांची फवारणीही नसल्याने अधिकाधिक शेतकरी ऊस लागवडीस पसंती देत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे ते शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. परिसरात चार कारखाने आहेत. त्यामुळेही लागवडीला बळ मिळाले आहे. सुधारित जातीचे ऊस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान वापरत आहे..जळगावची देखील आघाडीजळगावात उसाखाली सुमारे 14 हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. तसेच धुळ्यातली पाच हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यातील शिरपूर, साक्री भागात ऊस पीक आहे. ऊस पीक अतिपावसाने काही भागात हवे तसे वाढले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांनी जिद्दीने खत व अन्य बाबींचे व्यवस्थापन करून पीक वाढविले आहे. पण सध्या उष्णता वाढली आहे. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत असून, सिंचनासाठी ठिबकचा उपयोग वाढल्याने काही भागात अडचण कमी आहे. पण पाट पद्धतीने पाणी देताना सध्या नाकीनऊ येत आहेत. कारण ऊन तापत आहे. वीजपुरवठा व्यवस्थित नसतो, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.