Maharashtra Karnataka Farmers Protest: साखरेची एमएसपी आणि इथेनॉल दरवाढ करावी तसेच ऊस गाळप हंगाम लवकर सुरु करायचा असल्यास शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज (दि. १३ ऑक्टोबर) कोगनोळी टोल नाका येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. यामुळे पुणे- बंगळूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे..महाराष्ट्राच्या सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकमधील हत्तरगी टोल नाका येथे हजारो शेतकऱ्यांनी ठिय्या दिल्याने हा प्रमुख महामार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत..Sugarcane FRP: 'काकानं उसाला ५ हजारांचा दर ठेवलाय का? म्हणणाऱ्या वळसे पाटलांना शेट्टींचा सवाल, 'तुमच्या बापाची पेंड आहे का?' .साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये आणि सी हेव्ही इथेनॉल दर प्रति लिटर ७० रुपये करावा. तसेच सरकारला लवकर हंगाम सुरू करायचा असल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रूपये अनुदान द्यावे, या तीन प्रमुख मागण्यासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. याबाबत सोमवारी दिल्लीत बैठक झाली. पण ही बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर शेट्टी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज सकाळी ११ वाजल्यापासून दोन्ही राज्यांच्या सीमांवर आणि प्रमुख महामार्गांवर आंदोलकांनी धरणे आंदोलन सुरु केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत. .Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा.वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली कोगनोळीसह हत्तरगी टोल नाक्यावरही हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे पुणे- बंगळूर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जात आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिसांकडून सीमा परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. .आंदोलनस्थळी मुक्काम करण्याची तयारीजोपर्यंत केंद्र सरकार आमच्या मागण्यांवर लेखी निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत महामार्गावरुन उठणार नाही. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा न काढल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच मुक्काम करण्याची तयारी केली आहे. कागल आणि निपाणी तालुक्यातील गावांमधून शेतकऱ्यांसाठी भाकरी आणि पिठलं गोळा केले जात आहे. टोल नाक्यावरच जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. .जोपर्यंत साखरेची एमएसपी आणि इथेनॉल दरवाढीची मागणी पूर्ण होत नाही; तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. कारखान्यांनी बघ्याची भूमिका न घेता कारखाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र, कर्नाटकातील शेतकरी नेत्यांनी केले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.