Bhausaheb Thorat Sugar Factory : थोरात कारखाना राबविणार ऊसविकास योजना

Sugar Mill : कारखाना बेणेवाटप, रोपांद्वारे उसाची लागवड कार्यक्रम, संशोधन संस्थेकडील बेणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
 Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Nagar Sugar Factory News : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी २०२४-२५ या गळीत हंगामाकरिता को. ८६०३२, को.एम. ०२६५, कोसी.६७१, कोव्हीएसआय ०८००५, को. ९०५७, एम.एस.१०००१ या व इतर नवीन जादा साखर उतारा देणाऱ्या मान्यताप्राप्त जातींच्या उसाची लागवड व खोडवा राखणाऱ्या शेतकऱ्यांकरिता कारखान्यातर्फे एक जून २०२३ पासून ऊसविकास योजना राबविण्याचे धोरण संचालक मंडळाने घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी दिली.

कारखाना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड होऊन गाळप क्षमते इतका ऊस निर्माण होण्यासाठी संचालक मंडळ व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध ऊसविकास योजना राबविण्याचे धोरण आखण्यात येते.

२०२४ -२०२५ च्या गळीत हंगामात लागवड होणाऱ्या आडसाली, पूर्वहंगामी सुरू व खोडवा उसासाठी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रासायनिक व जिवाणू खते, बेणेपुरवठा, सेंद्रिय, हिरवळीचे व गांडूळखत, माती परीक्षण, ठिबकवरील उसासाठी अनुदान, ऊस रोपांचा पुरवठा आदी योजना जाहीर केल्या आहेत.

 Sugar Factory
Sugar Market Rate : बांगलादेशात साखर महागली

कारखाना बेणेवाटप, रोपांद्वारे उसाची लागवड कार्यक्रम, संशोधन संस्थेकडील बेणे पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, वसूलपात्र बिनव्याजी योजनेअंतर्गत द्रवरूप जिवाणू, हिरवळीची खते, कीड व रोगनियंत्रणासाठी कीटकनाशके पुरविण्यात येतील.

शेतकऱ्यांसाठी जैविक रोगनियंत्रक व माती, पाणी नमुना तपासणी माफक दरात उपलब्ध आहे. ठिबक सिंचन योजनेसाठी एकरी चार हजार रुपयांचे मीटर पेप्सी लॅटरल वसुलीच्या अटीवर दिले जाईल.

ऊसलागवड केल्यानंतर वसुलीच्या अटीवर अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येईल, तसेच उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊस उत्पादकता पुरस्कारही देण्यात येणार आहे.

कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनांची अधिक माहिती व लाभ घेण्यासाठी शेतकी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे व संचालक मंडळ, तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com