Sugarcane Crushing : सांगली जिल्ह्यात ऊस गाळपास गती

Sugarcane Season : यंदाच्या गाळपास उस टंचाईचा किंचित परिणाम जाणवू लागला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीचे काटेकोर नियोजन करत शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे.
Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon

Sangli News : जिल्ह्यात साखर कारखान्यांच्या गाळप हंगामास गती आली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ३५ लाख ७३ हजार टन उसाचे गाळप केले असून ३५ लाख ४४ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. पंधरा ते वीस दिवसांत १० लाख ७५ हजार उसाचे गाळप केले आहे. कुंडलचा क्रांती कारखाना गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

यंदाच्या गाळपास उस टंचाईचा किंचित परिणाम जाणवू लागला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीचे काटेकोर नियोजन करत शेतकऱ्यांना ऊस गाळपासाठी घेऊन येत असल्याचे चित्र आहे. साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू होऊन अडीच महिने झाले.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप १३ लाख टनांवर

डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी २४ लाख ९८ हजार टन उसाचे गाळप करून २३ लाख ५२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. क्रांती कारखाना गाळप आणि साखर उत्पादनात आघाडीवर होता. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून साखर कारखान्यांच्या गाळपास गती आली आहे.

Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : गाळप, साखर उत्पादनात, सोलापूर जिल्हा आघाडीवर

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी केलेले गाळप आढावा

कारखाना गाळप (टन) उत्पादन (क्विंटल) उतारा टक्के

श्री दत्त इंडिया २.८७लाख २.८३लाख १०

राजारामबापू पाटील, साखराळे ३.३३लाख ३.५१लाख १०

विश्वासराव नाईक २.५०लाख २.७१लाख ११

हुतात्मा वाळवा २.०१लाख २.२८लाख ११

राजारामबापू पाटील (वाटेगाव) २.२१लाख २.५८लाख १२

राजारामबापू पाटील (जत) १.१०लाख १.१३लाख ९

सोनहिरा वांगी ३.९८लाख लाख३.४८ ११

क्रांती कुंडल ३.९८लाख लाख३.४८ ११

राजारामबापू पाटील (सर्वोदय) १.५३ लाख १.७५ लाख १२

मोहनराव शिंदे १.२३ लाख १.२३ लाख १०

दालमिया (निनाईदेवी) १.९४ लाख २.२१ लाख ११

भारती शुगर (यशवंत शुगर) ४६ हजार ४३ हजार १०

केन ॲग्रो १.३७ लाख १.२४ लाख १०

उदगिरी शुगर २.५७ लाख २.४७ १०

सद्गुरू श्री श्री २.७८ लाख २.१९ लाख ८

श्रीपती शुगर १.६४ लाख १.७३ लाख ११

एकूण .३५.७३ लाख ३५.४४ लाख ९.४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com