Solapur News: यंदाचा राज्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तरीही गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस आणि साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. ३० जानेवारी अखेर राज्यातील साखर कारखान्यांनी ८ कोटी ३८ लाख ५१ हजार टन ऊस गाळपाचा महत्त्वपूर्ण असा टप्पा पूर्ण केला आहे. आणखी एक ते दीड महिना हंगाम चालेल, अशी शक्यता साखर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. .दरम्यान, आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी राज्यात सर्वाधिक १ कोटी ३४ लाख १३ हजार ६३२ टन उसाचे गाळप करून १ कोटी १६ लाख २३ हजार ८१८ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याने कोल्हापूर विभागापेक्षा जवळपास १५ लाख टनांनी अधिक उसाचे गाळप करून विक्रम केला आहे..Sugarcane Crushing Season: सोलापूर विभागात दीड कोटी मे.टन उसाचे गाळप.अतिवृष्टी, महापूर आणि सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ सुरू असलेला पाऊस या सर्व नैसर्गिक संकटांवर मात करून यावर्षी राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू झाला. सततचा पाऊस आणि महापुरामुळे यावर्षी उसाचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज होता. परंतु तसे न होता, तुलनेने ऊस उत्पादनात वाढ झाल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. यावर्षी राज्यात एकूण २०६ साखर कारखाने सुरू आहेत. यामध्ये १०४ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आजअखेर राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ८ कोटी ३८ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप करून ७ कोटी ७१ लाख ३ हजार क्विंटल साखर उत्पादन केले आहे. एकूण साखर उतारा ९.२ टक्के इतका मिळाला आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल निर्मिती केली आहे. त्यामुळे साखर उत्पादन कमी झाले आहे..साखर उताऱ्यातही सहकारी कारखान्यांची बाजीखासगी साखर कारखान्यांपेक्षा यावर्षी सहकारी साखर कारखान्यांनी अधिकचे ऊस गाळप केले आहे. यामध्ये खासगी १०४ साखर कारखान्यांनी ४ कोटी १४ लाख तर सहकारी १०२ कारखान्यांनी ४ कोटी २३ लाख टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळपाबरोबरच साखर उताऱ्यातही सहकारी साखर कारखान्यांनी बाजी मारली आहे..गतवर्षीचा विक्रम मोडण्याची शक्यतादरम्यान, सोलापूर जिल्ह्याने राज्यात ऊस गाळप आणि साखर उत्पादनात मोठी आघाडी घेतली असून, जवळपास १ कोटी ३५ लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. अजूनही ऊस गाळप हंगाम सुसाट सुरू आहे. गतवर्षी राज्यात ८५० लाख टन उसाचे गाळप तर ८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गतवर्षीचा ऊस गाळपाचा विक्रम यावर्षी मोडून निघेल, अशी शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.