Satara News: यंदाच्या हंगामात जिल्ह्यात ऊस गाळपास वेग आला आहे. १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख ५५ हजार ८६७ टन उसाचे गाळप केलेले आहे. त्यातून ६६ लाख ८९ हजार ८५० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उताऱ्यात अल्प प्रमाणात सुधारणा झाली असून सध्या सरासरी ९.२२ टक्के साखर उतारा मिळत आहे. अनेक कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्याची उचल दिल्याने बिलांना ब्रेक लागला आहे. .जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला. सहकारी नऊ व खासगी आठ असे १७ साखर कारखाने गाळप करीत आहेत. सहकारी नऊ साखर कारखान्यांनी ३० लाख ९१ हजार ८०१ टन उसाचे गाळप करून ३३ लाख १३ हजार ७२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. या सर्व कारखान्यांना सरासरी १०.९२ टक्के साखर उतारा मिळाला आहे..Sugarcane Crushing Season: कार्यक्षेत्रातील ऊस तोडीकडे कारखान्यांचे दुर्लक्ष.खासगी आठ कारखान्यांनी ४१ लाख ६४ हजार ६६ टन ऊस गाळप करत ३३ लाख १३ हजार ७२० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी ७.९६ टक्के साखर उतारा मिळाल्याचे दिसून येत आहे. हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटला, तरी अजून साखर उताऱ्यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. सहकारी कारखान्यांच्या तुलनेत खासगी कारखान्यांचा साखर उतारा खूपच कमी आहे..अपुऱ्या ऊसतोडणी यंत्रणेमुळे तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. सर्वच कारखान्यांनी ३३०० ते ३५०० रुपये या दरम्यान दर जाहीर करत पहिल्या पंधरवड्यातील बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहेत. मात्र त्यानंतर अनेक कारखान्यांनी बिले रखडवली आहेत. बिलांना होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारणावर परिणाम होत आहे. पीक कर्जाच्या व्याज रकमेतही वाढ होत आहे. ऊस लवकर तुटावा यासाठी शेतकरी बिलाविषयी गप्प राहण्याची वेळ आली आहे..Sugarcane Crushing Season: धाराशिव जिल्ह्यात ऊस गाळपाची बुलेट ट्रेन सुसाट.एकरी चार ते पाच हजार रुपयांची लूटजिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांची तोडणी मजूर यंत्रणा कमी आली आहे. यामुळे ऊस तोडणी कार्यक्रम विस्कळीत झाला आहे. शेतकरी ऊस वेळेत तुटावा यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र तोडणी मजुरांकडून मजबुरीचा फायदा घेतला जात आहे. सध्या एकरी चार ते पाच हजार रुपये मजुरी घेत असून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांकडून ३०० रुपये एन्ट्री घेण्याचे प्रकार सुरू आहेत..हंगाम जसजसा पुढे जाईल तसतशी या रकमेत वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे एकरी ऊस तोडण्यासाठी चार ते पाच हजार रुपये जात आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून तक्रार केली, तरी या प्रकारावर कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.